• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाच महिन्यांनंतर उद्या (रविवारी) बारामतीमध्ये भरणार अजितदादांचा जनता दरबार!

Maha News Live by Maha News Live
April 16, 2022
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

बारामती : महान्यूज लाईव्ह

सकाळी सहा वाजल्यापासून बारामती मधील विद्या प्रतिष्ठानच्या माहिती आणि तंत्रज्ञान सभागृहासमोर लागलेल्या अभ्यागतांच्या रांगा.. उपमुख्यमंत्र्यांचे आगमन होताच थेट लोकांमध्ये मिसळून प्रत्येकाशी संवाद साधत प्रत्येकाच्या तक्रारींचे निवारण करत पुढे जाणारे अजित दादा…! सर्व लोकांना भेटल्यानंतरच पुन्हा आपल्या कामाकडे निघणारे अजितदादा मागील दोन वर्षात अनेकदा असंख्य लोकांनी पाहिले..! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लोकहित व जन सुरक्षा लक्षात घेऊन थांबलेला हा जनता दरबार आता उद्या रविवारपासून पुन्हा सुरू होतोय..!

रविवारी सकाळी विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहाबाहेर पुन्हा एकदा जनता दरबार होणार आहे. अजितदादांच्या या अगदी पहाटेपासून सुरू होणाऱ्या जनता दरबाराचे राज्यभरात अनेकदा कौतुक झाले आहे. प्रत्येकाशी थेट संवाद आणि जी कामे जागच्या जागी होऊ शकतात तिथेच निर्णय घेऊन त्या तक्रारीचा निपटारा करण्याचे काम अजित पवार करतात. त्यामुळे फक्त बारामती तालुक्यातील नव्हे, तर आसपासच्या तालुक्यातीलही पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक अजितदादांना भेटण्यासाठी आवर्जून या जनता दरबारामध्ये येतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील आठवड्याप्रमाणे उद्यादेखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भरगच्च दौरा असून बारामती तालुक्यासह दौंड तालुक्यातही भेटी देणार आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून विकास कामांची पाहणी, त्यानंतर आलेल्या लोकांच्या भेटीगाठी आणि त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रम असा अजित पवार यांचा उद्याचा दिनक्रम असणार आहे.

तब्बल सहा महिन्यानंतर अजितदादा अधिकृतरित्या जनता दरबारात भेटणार असल्याने लोकांमध्ये देखील उत्सुकता आहे. अर्थात मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सार्वजनिक कार्यक्रम व जाहीर सभा होत असल्याने या ठिकाणीच अजितदादा निवेदन स्वीकारत आहेत. शिवाय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आणि त्यांचे पक्षाचे सर्व सहकारी सोमवारी आणि गुरुवारी राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात थांबून लोकांची निवेदने स्वीकारत होते, अजितदादांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे, हनुमंत पाटील हे देखील लोकांना भेटत होतेच, त्यामुळे ही कामे थांबलेली नव्हतीच, परंतु खास निवेदने स्विकारण्यासाठी आणि लोकांना थेट अजितदादांशी संवाद साधण्यासाठी अजितदादा यापूर्वी जो वेळ देत होते, ते आता विद्या प्रतिष्ठानच्या माहिती व तंत्रज्ञानज्ञान सभागृहासमोर पाहायला मिळणार आहे.

Tags: Ajit PawarBaramati DevolopementDY CM AJITDADA PAWAR
Next Post
दुचाकी चोरांनो सावधान ! यवत पोलिसांनी आखली व्युहरचना ! मोटारसायकल चोरल्यास अडकणार पोलिसांच्या जाळ्यात !

दुचाकी चोरांनो सावधान ! यवत पोलिसांनी आखली व्युहरचना ! मोटारसायकल चोरल्यास अडकणार पोलिसांच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group