• Contact us
  • About us
Wednesday, August 26, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

mahaanewslive by mahaanewslive
July 11, 2026
in महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, Featured
0
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

मुंबई : महान्यूज लाईव्ह

गड्यांनो, गाव कारभारी होण्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत घेतली.. आतापासूनच भरपूर खर्च केला आहे.. दररोज तुमच्या मोकळ्या होत चाललेल्या खिशांमुळे आणि वाढत झालेल्या गर्दीमुळे हॉटेल भरून वाहत आहेत.. मंदीच्या काळात देखील आणि तिकडे युद्धाचे ढग असताना देखील इकडे मात्र पैशाचा पाऊस पडत आहे.. पण आमचा नाईलाज आहे.. कारण अडचण आहे ती sir आणि गुरुजींची.. भावांनो, तुमच्यासाठी गुरुजी फार मेहनत घेत आहेत.. वेळेत काम करण्यासाठी झपाटलेत.. पण वेळ लागतोय (sir)सरांमुळे..!

राज्यातील सुमारे १३ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) मोहीम सध्या सुरू असल्याने निवडणूक प्रक्रिया जानेवारीनंतरच राबविण्यात येण्याची शक्यता असून त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडूनही स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचे वेळापत्रक लांबणीवर पडण्याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान नव्या मतदारांची नोंदणी, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, हरकती व दावे स्वीकारणे तसेच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. राज्यातील हजारो ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आला असून अनेक ठिकाणी प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे.

अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र मतदार यादीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा आयोगाचा निर्णय असल्याने निवडणूक प्रक्रिया काही काळ पुढे जाणार असल्याचे संकेत आहेत. निवडणुका पुढे गेल्यास इच्छुक उमेदवारांना जनसंपर्कासाठी अधिक वेळ मिळणार असला, तरी अनेक गावांमध्ये निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढणार आहे. विविध राजकीय पक्षांनीही ग्रामीण भागात संघटनात्मक हालचालींना वेग देण्यास सुरुवात केली असून संभाव्य उमेदवारांकडूनही तयारी सुरू झाली आहे.

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप अंतिम निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा, उमेदवारी अर्ज, मतदान आणि मतमोजणीबाबतची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत सर्वांचे लक्ष आयोगाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

Next Post
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group