• Contact us
  • About us
Sunday, July 5, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

mahaanewslive by mahaanewslive
July 2, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, शेती शिवार, महाराष्ट्र
0
26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद संपतराव जगताप यांच्या २६ वर्षांच्या सेवेनिमित्त आयोजित सत्कार समारंभ मंगळवारी मुख्य बाजार आवारातील नवीन रेशीम मार्केट इमारतीत पार पडला. यावेळी बाजार समितीचे आजी-माजी पदाधिकारी, संचालक, शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात सुनील पवार यांनी जगताप यांच्या सेवाकाळाचा उल्लेख करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर सूर्यकांत मोरे यांनी जगताप यांच्या २६ वर्षांच्या सेवाकाळाचा आढावा घेत त्यांच्या प्रशासकीय कार्यपद्धती, राज्यातील सचिव कॅडर समितीवरील जबाबदारी, उत्कृष्ट प्रशासकीय पुरस्कार तसेच उपविभागीय बाजार समिती सेवक पतसंस्थेच्या स्थापनेतील योगदानाचा उल्लेख केला.

यावेळी शरद भोसले यांनी जगताप यांच्या कार्यावर आधारित लघुचित्रफीत सादर केली. त्यामध्ये बाजार समितीच्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. उपबाजार आवारासाठी जागा उपलब्ध करून देणे, पेट्रोल व सीएनजी पंप उभारणी, बारामती, जळोची, सुपे आणि झारगडवाडी येथील जागा संपादन, ई-नाम प्रणालीची अंमलबजावणी, रेशीम कोष मार्केट, जळोची येथील नवीन कार्यालयीन इमारत, रयत भवनातील शेतकरी मॉल तसेच व्यापारी गाळ्यांच्या उभारणीसह विविध प्रकल्पांमध्ये जगताप यांच्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला.

कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर यांनीही मनोगत व्यक्त करत बाजार समितीच्या विकासासाठी विविध प्रकल्पांना मंजुरी व निधी मिळवून देण्यासाठी जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेतली. यावेळी अरविंद जगताप यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना जगताप यांनी आपल्या सेवाकाळात सहकार्य करणारे पदाधिकारी, कर्मचारी, शेतकरी, व्यापारी तसेच सर्व संबंधितांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपसभापती अरुण सकट यांनी केले. या प्रसंगी पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी किर्वे, फळे-भाजीपाला आडतदार संघटनेचे अध्यक्ष सईद बागवान, बाजार समितीचे सभापती विनायक गावडे, उपसभापती अरुण सकट, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप, माजी नगरसेवक सुरज सातव यांच्यासह बाजार समितीचे आजी-माजी पदाधिकारी, संचालक, शेतकरी, व्यापारी, हमाल-मापाडी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

दौंडच्या खुटबावमधील दुहेरी खून प्रकरण! आरोपीला बारामती सत्र न्यायालयाची जन्मठेप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

स्टिंग पेयावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शाळांपासून अर्धा किलोमीटर परिसरात विक्रीस बंदी

July 3, 2026
वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

July 3, 2026
दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

July 3, 2026

ग्वाल्हेरमध्ये पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या लड्डू गोपालच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त

July 3, 2026
बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

July 2, 2026
बारामतीच्या ग्रामीण भागात दररोज ४ तास भारनियमन; नागरिक त्रस्त, संताप वाढला!

महावितरणच्या नव्या स्मार्ट मीटरविरोधात ४ जुलै रोजी इंदापूर बंदचे आवाहन!

July 2, 2026
मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

July 2, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

दौंडच्या खुटबावमधील दुहेरी खून प्रकरण! आरोपीला बारामती सत्र न्यायालयाची जन्मठेप!

July 2, 2026
26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

July 2, 2026
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

इंदापूर नगरपरिषदेसमोर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला; प्रसंगावधानामुळे बचाव, एक जखमी

July 2, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group