• Contact us
  • About us
Monday, August 31, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

mahaanewslive by mahaanewslive
July 11, 2026
in सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, महिला विश्व, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राष्ट्रीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नाशिक : महान्यूज लाईव्ह

नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आल्यानंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींची सुरक्षितता, आरोग्य तपासणी व्यवस्था आणि प्रशासकीय देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्राथमिक तपासात संबंधित विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे विद्यार्थिनी गर्भवती असताना शाळा, वसतिगृह प्रशासन, संबंधित अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेला याची कुठलीच कल्पना कशी आली नाही?

निवासी आश्रमशाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि विद्यार्थिनींची देखरेख होत असेल तर इतकी मोठी घटना शेवटच्या टप्प्यापर्यंत दडून कशी राहिली असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण, शिक्षण आणि संरक्षण देण्यासाठी उभारलेल्या आश्रमशाळांमध्येच अशी घटना घडणे ही संपूर्ण व्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.

या प्रकरणात केवळ आरोपीवर कारवाई करून थांबणे पुरेसे नसून संबंधित शाळा प्रशासन, वसतिगृह व्यवस्था, आरोग्य विभाग आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेनंतर आदिवासी विकास विभागाने चौकशी सुरू केली असून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.

दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी तसेच राज्यातील सर्व निवासी आश्रमशाळांमध्ये सुरक्षा, आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि देखरेख व्यवस्थेचे तातडीने विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे.

मोहनदरीतील ही घटना केवळ एका विद्यार्थिनीची शोकांतिका नसून आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटींचा गंभीर इशारा आहे. या घटनेतून प्रशासनाने धडा घेत ठोस सुधारणा केल्या नाहीत तर अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री कोण देणार हा प्रश्न आता संपूर्ण समाजासमोर उभा राहिला आहे.

Next Post
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group