इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राज्यात लॉकडाऊन होणार नाही. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. मात्र आपल्या परिसरात बाधित रुग्णांची संख्या वाढणार नाही, यासाठी आपण काळजीपोटी तोंडाला मास्क वापरला पहिजे, शासनाने घालून दिलेल्या निकषांची तंतोतंत अंमलबजावणी करावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (शनिवार) इंदापूरातील शासकीय विश्रामगृहात वाढत्या कोरोनाच्या परिस्थिती बाबत आढावा तातडीने बैठक घेण्यात आली होती. याबैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.भगवान पवार,तहसीलदार अनिल ठोंबरे,गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे आदींसह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सध्या लाॅक डाऊनच्या नावाखाली काहिजन साठेबाजार किंवा शेतमालाचे मार्केट डाऊन करण्याचे प्रयत्न करत आहेत, हि बाब चुकीची आहे, आपल्या भागात डाळींब,द्राक्षांसह इतर पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात.लाॅक डाऊन च्या भितीने शेतकरी शंभर रूपयाची वस्तू सत्तर रूपयाला घाबरुन विकत आहेत. त्यामुळे जनतेने घाबरुन जावू नये. लाॅक डाऊन होणार नाही, मात्र शासनाने घातलेले निर्बंध पाळणे गरजेचे आहे.
राज्यमंत्री भरणे म्हणाले,की सध्या इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात 76 तर शहरात 32 रुग्ण हे कोरोना बाधित आहेत. अशा 108 व्यक्तींवर सध्या उपचार सुरु आहे. ग्रामीण भागातील भिगवण आणि पळसदेव या दोन गावातून रुग्णांची संख्या अधिक आहे.तर शहरातील आंबेडकर नगर मध्ये बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. हे पाहता जिथे बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे,तिथे तातडीने घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. निश्चित कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याला थोपवण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. मी तालुक्यातील नागरिकांना एकच आवाहन करु इच्छितो की कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही.आपल्या ओपरिसरात बाधित रुग्णांची संख्या जास्त वाढणार नाही यासाठी आपण काळजीपोटी तोंडाला मास्क वापरला पाहिजे.











