• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

tdadmin by tdadmin
May 29, 2026
in यशोगाथा, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, Featured
0
दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह

दौंड : दौंड शहरातील नगरपरिषदेच्या प्रस्तावित ‘नमो उद्यान’ प्रकल्पाच्या जागेवरून वाद पेटला आहे. नगरसेविका स्वाती नीलेश सावंत यांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी पुणे व नगरविकास विभागाकडे अधिकृत तक्रार व कायदेशीर आक्षेप घेत याचिका दाखल केली आहे.

नगरसेविका सावंत यांच्या निवेदनानुसार, दौंड शहरातील सि. स. नं. 194 (आरक्षण क्र. 50) या जागेवर उद्यान उभारण्याचा प्रस्ताव हा विकास आराखडा, MRTP Act 1966 आणि शासन निर्णयांचे उल्लंघन करणारा आहे. संबंधित जागा मूळतः ‘टेलिफोन एक्सचेंज’साठी आरक्षित असून उद्यानासाठी मंजूर नाही. माहिती अधिकारातून मिळालेल्या पत्रात मुख्याधिकाऱ्यांनी ही बाब मान्य केली असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.

नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत या विशिष्ट जागेचा उल्लेख न करता लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवण्यात आले, असा आरोप आहे. मात्र प्रसार माध्यमांमध्ये त्याच जागेवर ‘नमो उद्यान’ उभारण्याबाबत विधाने करण्यात आली. शहरात आधीपासूनच बाग-बगिचे व खुल्या जागांसाठी ११ अधिकृत आरक्षणे उपलब्ध असताना नवीन जागेचा आग्रह धरणे संशयास्पद असल्याचे सावंत म्हणाल्या.

सावंत यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये प्रस्तावित ‘नमो उद्यान’च्या कामाला तातडीने स्थगिती द्यावी. Change of Land Use (CLU) प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी करावी. विकास आराखड्यानुसार पर्यायी जागेचा विचार करावा. केंद्रीय दूरसंचार विभागाची NOC/छजड ची पडताळणी करावी. जुन्या गावठाण भागात नागरिकांसाठी उद्यान सुविधा उपलब्ध करून द्यावी. आदींचा समावेश आहे.

    दरम्यान, या प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाची बाजू अद्याप समोर आलेली नाही. आरक्षण बदलाच्या प्रक्रियेवरून व ‘नमो उद्यान’च्या नावावरून शहरात राजकीय वातावरण तापले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

    दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

    May 29, 2026
    मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

    मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

    May 29, 2026
    पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

    पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

    May 29, 2026
    गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

    अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

    May 29, 2026
    राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

    राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

    May 29, 2026
    बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

    बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

    May 29, 2026
    शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

    शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

    May 29, 2026
    बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

    बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

    May 29, 2026
    ‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

    ‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

    May 29, 2026
    बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

    माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

    May 29, 2026
    Load More

    Website Maintained by : Tushar Bhambare

    No Result
    View All Result
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
      • पुणे
      • मुंबई
      • कोकण
      • मराठवाडा
      • विदर्भ
      • उत्तर महाराष्ट्र
      • पश्चिम महाराष्ट्र
    • राजकीय
    • क्राईम डायरी
    • मनोरंजन
    • महिला विश्व
    • व्यक्ती विशेष
    • शेती शिवार
    • लाईव्ह

    Website Maintained by : Tushar Bhambare

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In
    कॉपी करू नका.
    Join WhatsApp Group