इंदापूर : महान्यूज लाईव्ह
इंदापूर शहरात अनेक रुग्णांना तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेची गरज भासते. हे लक्षात घेऊन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर शहरासाठी स्वतंत्र अत्याधुनिक सुविधांयुक्त रुग्णवाहिका देण्यात येईल. यासाठी 25 लाख रूपयांचा निधी दिला जाईल अशी माहिती दिली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूरच्या भागात अपघात झाल्यास किंवा इतर रुग्णांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये पोहोचता यावे यासाठी रुग्णवाहिका असावी, म्हणून सध्या रुग्णवाहिकेची कमतरता लक्षात घेऊन रुग्णवाहिका देणार आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी व इंदापूर शहरातील नागरिकांसाठी याचा उपयोग होणार आहे. ही रुग्णवाहिका आमदार निधीतून देण्यात येईल. असे त्यांनी सांगितले.











