• Contact us
  • About us
Friday, September 18, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

mahaanewslive by mahaanewslive
June 18, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शेती शिवार, महिला विश्व
0
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
माळेगांव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगाम २०२६-२७ यशस्वीपणे आणि वेळेत सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.कारखान्याच्या इंजिनिअरिंग विभागाकडील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम गुरुवार १८ रोजी सकाळी संपन्न झाला.या पूजन सोहळ्यामुळे कारखान्याच्या हंगामपूर्व तयारीला अधिकृत सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार व्हा.चेअरमन संगीताताई कोकरे यांच्या हस्ते उपस्थितीत विधिवत पूजन करण्यात आले.यावेळी नवीन मिल रोलर सज्ज करण्यात आले असून आगामी हंगामासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगण्यात आले.

कारखान्याचा गळीत हंगाम वेळेत सुरू व्हावा यासाठी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागातील कामांचा आढावा घेतला आहे. दुरुस्ती, देखभाल व तांत्रिक कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संचालक मंडळाने दिल्या आहेत. कारखान्याचे व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाने यंदाच्या हंगामात १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

हंगाम २०२६-२७ साठी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे १९ हजार ५०० एकर क्षेत्रावर ऊस उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यातून अंदाजे ७ लाख मेट्रिक टन ऊस सभासदांकडून उपलब्ध होणार आहे.याशिवाय विविध गेटकेन करारांद्वारे अतिरिक्त ऊस कारखान्याकडे येण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.त्यामुळे कारखान्याचे गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुरेसा ऊस उपलब्ध राहणार आहे.

ऊस तोडणी व वाहतुकीसाठी आवश्यक यंत्रणांची उभारणी देखील पूर्णत्वाकडे आली आहे.चालू वर्षात १,२०० बैलगाडी, ५७० ट्रॅक्टरगाडी,४०० ट्रक-ट्रॅक्टर तसेच १५ हार्वेस्टर यंत्रांचे करार पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.त्यामुळे ऊस वाहतुकीचे नियोजन अधिक प्रभावीपणे होणार असून शेतकऱ्यांना वेळेत ऊस तोडणीची सुविधा मिळणार आहे.

या वेळी व्हाईस चेअरमन संगीताताई कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरुंगले, तानाजी कोकरे, योगेश जगताप, स्वप्नील जगताप, गणपत खलाटे, विजय तावरे, प्रताप आटोळे, सतीश फाळके, अविनाश देवकाते, जयपाल देवकाते, देविदास गावडे, नितीन सातव, रत्नकुमार भोसले, ज्योती मुलमुले, नितीन शेंडे, विलास देवकाते, दत्तात्रय येळे, रामदास आटोळे, विशाल जगताप, कामगार संचालक चंद्रशेखर जगताप, प्रभारी कार्यकारी संचालक श्रीकांत पाटील, वर्क्स मॅनेजर अनिल वाबळे यांच्यासह विभागप्रमुख, कर्मचारी, सभासद व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिल रोलर पूजनानंतर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामाच्या तयारीला अधिक गती मिळाली असून, यंदा विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासन, संचालक मंडळ आणि ऊस उत्पादक शेतकरी यांचे समन्वयाने प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्येही आगामी हंगामाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Next Post
एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group