• Contact us
  • About us
Friday, June 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

mahaanewslive by mahaanewslive
June 18, 2026
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, मनोरंजन, मराठवाडा, महिला विश्व, मुंबई
0
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

शशांक मोहिते, भाषण कला प्रशिक्षक, बारामती

२८ एप्रिल २०१८ रोजी ची घटनाः स्थळ- जोगेश्वरी येथील रविंद्र वायकरांचे मातोश्री क्लब. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दवसाहेब, आदित्यजी, सुभाषजी देसाई हे शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांसाठी आयोजित ‘वक्ता प्रशिक्षण’ कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभासाठी आले होते. मार्गदर्शक वक्ते म्हणुन प्रसिध्द शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील व मला निमंत्रित करण्यात आले होते. दोन्ही सत्राला उध्दवसाहेब शिवसैनिकांबरोबर उपस्थित राहिले. त्यानंतर ते नियोजित कार्यक्रमांसाठी पुढे गेले.

सत्र संपल्यानंतर जेवण करत असताना राज्यसभेचे खासदार अनिलजी देसाई म्हणाले,”शशांकसर, ०२ मे ही तारीख राखुन ठेवा. उध्दवसाहेबांचा निरोप आहे. कदाचित तुम्हाला मातोश्री बंगल्यावर यावे लागेल.” ऐकताना मला ठसका लागला. बाप रे, मातोश्री…! खरं सांगतो, मी त्यावेळी ते फारसं गांभीर्याने घेतले नव्हते. यापुर्वी अशाच पध्दतीने अनेक राजकीय पुढार्‍यांनी आपण एकदा निवांत भेटुया असे आश्वासन दिले होते.त्या निवांत भेटींची वाट पाहता पाहता १८ वर्षे अशीच निघुन गेली होती.

नंतर १ मे २०१८ ला परत तसा फोन आल्यानंतर २ मे रोजी मुंबई गाठली. मातोश्रीच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षाव्यवस्थेचे सोपस्कार पार पडल्यानंतर आमची सुटका झाली. शिवसेनेच्या वक्ता प्रशिक्षण शिबिरासंदर्भातील पुढील नियोजनासाठी माननीय उध्दवसाहेब ठाकरे, खासदार अनिलजी देसाई, प्रसिध्द व्याख्याते नितीनजी बानुगुडे पाटील व आम्ही पामर उर्फ शशांक मोहिते अशी फक्त चौघांचीच बैठक ‘मातोश्री’ बंगल्यामधील एका अँटीचेंबरमध्ये तासभर चालली. ( हे असं अँटीचेंबरमध्ये मिटींग करताना लई भारी वाटतं राव. आपणही राज्याचे धोरण ठरवतोय की काय असंच वाटत राहतं.)

बैठकीदरम्यान खानापुर आटपाडीचे आमदार अनिलजी बाबर लग्नपत्रिका घेऊन निमंत्रण द्यायला आल्याचा निरोप मिलिंद नार्वेकरांनी दिला असता उध्दवसाहेबांनी आमदार अनिलजींना तिथेच बोलावले. आमदार येताच उध्दवजींनी उभे राहुन नम्रपणे हात जोडुन नमस्कार करुन ती लग्नपत्रिका स्वीकारली, हे मला महत्वाचं वाटलं आणि आवर्जुन तुम्हाला शेअर करावंसं वाटलं. (समोरच्याला आपण कसं वागवतो यावर आपलाही मोठेपणा ठरतो. हे आदरणीय पवारसाहेबांकडुन आपण शिकलो आहोतच! )

आमदार माघारी गेल्यानंतर आमची बैठक परत सुरु झाली. बैठकीदरम्यान जाणवलं की उद्धवजी चांगले श्रोते आहेत. शांतपणे समोरच्याचे मत, प्रतिक्रिया जाणुन घेतात. नेमके प्रश्न विचारतात. मुद्येसुद चर्चा करतात. आपुलकी आणि शिस्त याचा बरोबर बॅलन्स करतात.

बैठक संपताना चहा आल्यानंतर माझी अस्वस्थता जाणवल्यावर उध्दवजींनी कारण विचारले.” मला शुगर असल्याने मी शक्यतो बिनासाखरेचाच चहा घेतो” असं सहज म्हणताच त्यांनी त्यांचाही चहा परत पाठवला आणि म्हणाले, शशांकजींचा Without sugar चहा देताना मग मलाही द्या. मी त्यांना चहाला कंपनी देतो.” एवढा Respect पाहिल्यावर मनातल्या मनात मला दबंग मधला डायलाॅग आठवला. “थप्पड से डर नहीं लगता साब, लेकीन प्यार से डर लगता है । “

चहा झाल्यावर उध्दवसाहेब एका कार्यक्रमासाठी पुढे जाणार होते. “अनिल, मी आता निघतो. पण पुढच्या तीन प्रशिक्षण शिबिराच्या तारखा, नियोजन याबाबत शशांकजींशी व नितीनजींशी बोलून बाकीचे ठरवुन घे.”
तेवढ्यात आम्हाला आठवले, मित्र नविदभाई पठाण व उमेशजी दुबे यांनाही उध्दवसाहेबांशी भेटायची, बोलायची इच्छा होती. उध्दवजींना तशी विनंती करताच त्यांनी मिलिंद नार्वेकरांकडे निरोप देऊन दोघांनाही आत बोलावले. मग चेंबरच्या बाहेर छायाचित्रकार प्रभाकर वराडकरांनी खच्याक करत फटाफट फोटो टिपले. तसेच नविदभाई व उमेशजींशी चौकशी करत आपुलकीने संवादही साधला.

Next Post
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group