• Contact us
  • About us
Thursday, September 17, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

mahaanewslive by mahaanewslive
June 18, 2026
in सामाजिक, सुरक्षा, मनोरंजन, मराठवाडा, महिला विश्व, मुंबई
0
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

राज्याला हादरवणारे दौंडमधील स्त्री-भ्रूणहत्या प्रकरण थांबेना!

राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह

दौंड : स्त्री-भ्रूणहत्येसारख्या सामाजिक कलंकाविरोधात पुणे ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई सुरूच आहे. बेकायदेशीर लिंग निदान व स्त्री-भ्रूणहत्येचे मोठे रॅकेट उघडकीस आणत यवत पोलिसांनी केडगाव येथील ‘पार्थ हॉस्पिटल’च्या संचालिका डॉ. संगीता पांडुरंग गायकवाड (वय ६१) यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्यात यापूर्वी अटक केलेला मुख्य आरोपी अण्णासाहेब आप्पा गिरी (वय ४३, रा. केडगाव, मूळ हंगा, ता. पारनेर) हा कोणताही अधिकृत परवाना किंवा वैद्यकीय पदवी नसलेला बोगस डॉक्टर आहे. हा तोतया डॉक्टर पोर्टेबल सोनोग्राफी मशीनद्वारे गरोदर महिलांचे बेकायदेशीर लिंग निदान करत होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गर्भ मुलीचा असल्याचे कळताच तो महिलांना बेकायदेशीर गर्भपातासाठी केडगावच्या पार्थ हॉस्पिटलमध्ये पाठवत असे.

पार्थ हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. संगीता गायकवाड कोणत्याही नैतिक व कायदेशीर पात्रतेशिवाय अशा महिलांचे बेकायदेशीररित्या गर्भपात करत होत्या. विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या सखोल तपासात त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे मिळाले. त्यानुसार बुधवार, दि. १७ रोजी त्यांना अटक करण्यात आली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासात निष्पन्न पुराव्यांच्या आधारे कठोर कलमांची वाढ करण्यात आली आहे. यवत पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. ४६६/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ९१, ३(५), ८८ सह PCPNDT Act कलम ६(ब), ६(क), १८, २३, २५ आणि MTP Act १९७१ चे कलम ४, ६ अन्वये गुन्हा दाखल आहे. आरोपीला दौंड न्यायालयात हजर केले असता १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.

“स्त्री-भ्रूणहत्या हा केवळ कायदेशीर गुन्हा नसून मानवी मूल्ये आणि सामाजिक संतुलनाला काळीमा फासणारा अमानुष अपराध आहे. पैशांच्या हव्यासापोटी निसर्ग आणि कायद्याची पायमल्ली करणाऱ्या विकृतीला पाठीशी घालणाऱ्यांविरुद्ध पुणे ग्रामीण पोलीस कठोर पावले उचलत आहेत,” असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले.

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक राजेंद्र मायने यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे विशेष तपास पथक (SIT) या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे. अशा अमानुष कृत्ये करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलिसांनी दिला आहे.

Next Post
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group