नाशिक : महान्यूज लाईव्ह
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे अनेक विविध नमुने बाहेर पडत आहेत. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे गावाने एक भली मोठी बैठक घेऊन गावच्या सरपंचपदाचा लिलाव केला. हा लिलाव दोन कोटी पाच लाख रुपयांपर्यंत पोहोचला! त्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर वायरल होतोय, मात्र ही लोकशाहीची हत्या सरकार देखील उघड्या डोळ्यांनी पाहणार आहे का? हा प्रश्न आहे.
राज्यातील 14234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया सध्या सुरू असून 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती बिनविरोध करा असे आवाहन राज्यातील मंत्री आणि आमदार करीत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन लोकांनी या सरपंच पदाच्या प्रक्रियेचा लिलाव करण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील उमराणे गावात पुढाऱ्यांनी बैठक घेऊन एक कोटी 11 लाख आणि पासून या नावाची सुरुवात केली. हा लिलाव दोन कोटी पाच लाखांवर थांबला. गावातील रामेश्वर महाराज मंदिराच्या आवारात हा लिलाव झाला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत देवरे यांच्या पॅनल मधील सुनील देवरे यांनी हा लिलाव मिळवला, असे व्हिडिओमध्ये दिसत असून याची सध्या खूप चर्चा सुरू आहे. दरम्यान हे मिळालेले पैसे ग्रामदैवत रामेश्वराच्या जीर्णोद्धारासाठी वापरले जाणार आहेत.











