बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीतील रोटरी क्लबने गेल्या वर्षभरात केलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत पुण्यामध्ये झालेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बारामतीच्या रोटरी क्लबला बेस्ट क्लब इन डिस्ट्रिक्ट आणि बेस्ट सीएसआर प्रोजेक्ट या या पुरस्काराने गौरवण्यात आले
पुण्यात झालेला हा कार्यक्रम माजी डिस्टिक गव्हर्नर रवी धोत्रे व रोटरी क्लब चे इंटरनॅशनल डायरेक्टर महेश कोटबागी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यामध्ये रोटरी क्लबचे तत्कालीन अध्यक्ष सीए प्रतिक दोशी यांच्याकडे हा पुरस्कार देऊन बारामतीच्या रोटरी क्लबचे कौतुक करण्यात आले.
गेल्या वर्षभरात बारामती रोटरी क्लबने विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले. कोरोनाच्या काळामध्ये जनजागृती, मदत, तसेच कोरोनासाठी सामाजिक काम करणाऱ्यांचा गौरव करण्याबरोबरच, महाराष्ट्रातील पहिले गाव ठरलेल्या सपकळवाडी या ग्रामपंचायतीच्या क्वारंटाईन सेंटर उभारण्यासाठी रोटरी क्लब नेच पुढाकार घेतला होता.
या क्लबने केलेल्या भरीव मदतीमुळेच सपकाळवाडीतील क्वारंटाईन सेंटर उभारले गेले. याचा आदर्श घेत राज्यातील इतरही ग्रामपंचायतींनी आपल्या गावांमध्ये आपल्या ग्रामस्थांसाठी सेंटर उभी केली. याची देखील दखल या निमित्ताने रोटरी क्लबने राष्ट्रीय पातळीवर घेतली.










