महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या रूपाने संपूर्ण जग भयचकित झाले असतानाच भारतात देखील मागील सहा महिन्यांमध्ये तब्बल 19 प्रकारचे कोरोना चे वेगळे विषाणू आढळले आहेत.
ब्रिटनमधील झपाट्याने संक्रमित होणाऱ्या कोरोनामुळे जगातील अनेक देशांनी आपल्या देशात देखील कोरोना च्या नव्या चाचण्या सुरू केल्या आहेत. तर संपूर्ण लंडन हे लोक डाऊन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतातील आरोग्य यंत्रणा मात्र सतर्क आहे, मात्र फारशा चिंतेत नाही, याचे कारण शोधले असता भारतात गेल्या सहा महिन्यात कोरोनाच्या वेगवेगळ्या 19 प्रकारच्या विषाणूच्या गुणसूत्रांची आढळ झाली असल्यानेच भारतात फार चिंता व्यक्त केली जात नाही कोरोना नवनवे बदल घेत असल्याने कोरणा फार घातक ठरणार नाही अशा प्रकारचा विश्वास ही भारतात व्यक्त केला जात आहे दरम्यान आंध्र प्रदेशात मात्र एक तीव्र स्वरूपाचा विषाणू वाढला असून त्याला एन 440 अशा प्रकारचे नाव देण्यात आले आहे.











