महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
देशाला हरवणारी घटना आज कर्नाटक घडली कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एस. एल. धर्मेगौडा यांनी आज पहाटे आत्महत्या केली. कर्नाटकातील चिकमंगळूर नजीक रेल्वे रुळावर त्यांचा पहाटे मृतदेह आढळल्याने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.
धर्मेगौडा हे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे आमदार होते, तसेच ते कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती होते. धर्मे गौडा हे कर्नाटकातील माजी मुख्यमंत्री एसडी कुमार स्वामी त्यांच्या अत्यंत विश्र्वासातील होते. तसेच माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या देखील विश्वासातील व मर्जीतील आमदार म्हणून ओळखले जात होते.
त्यांनी अचानक केलेली आत्महत्या कर्नाटकामध्ये राजकीय हादरा देऊन गेली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यामध्ये सुरू असलेल्या झटापटीनंतर ही घटना घडल्याने आता कर्नाटकात नावाने राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.











