महान्यूज : आजची गझल
कोष त्यागला जसा अहमता झडू लागली
फुले उमलली तशी पाखरे इथे नाचली
◆
तो जो झाला थेंब जलाचा परोपकारी
त्याच्यासाठी इंद्रधनूच्या तोरणावली
◆
प्रेम दुश्मनी करा खुशीने पण टोकाची
अधली मधली इथे माणसे कुठे गाजली
◆
अशी वासना दलदल झाली माझ्यामधली
किती संपली अगणित नाती किती लाजली
◆
वाचत नाही फक्त पुस्तके कधी यार हो
बंद लिफाफ्यातली माणसे खूप वाचली
●
गझलकार-विष्णु जोंधळे, शहादा
सौजन्य : गझलपुष्प समूह पिंपरी-चिंचवड











