महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
अमेरिकेच्या निवडणूकीची चुरस आता शिगेला पोचली असून येत्या काही तासांतच अमेरिकेचे नवे अध्यक्ष कोण याचा फैसला होणार आहे. अशातच भारतासाठी खुशखबर ही आहे की, भारतीय वंशाचे चार जण हाऊस ऑफ रिप्रेंझेटेटिव्हजम म्हणून निवडून आले आहेत.
हे चारही उमेदवार डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार आहेत. प्रमिला जयापाल, रो खन्ना, अॅमी बेरा व राजा कृष्णमूर्ती असे हे चार विजयी उमेदवार आहेत. अर्थात त्यांनी भारतीय वंशाच्या उमेदवारांनाच पराभूत केलेले आहे. त्यामुळे ते जिथून निवडून आले, तिथे भारतीयांचाच दबदबा आहे हे नक्की..!
रो खन्ना यांनी रिपब्लीकन पक्षाचे रितेश टंडन यांचा पराभव केला, तर राजा कृष्णमुर्ती यांनी प्रिस्टन निल्सन यांना पराभूत केलं. यापैकी अॅमी बेरा यांनी पाचव्यांदा हाऊसमध्ये धडक मारली आहे.











