• Contact us
  • About us
Friday, August 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मूठभर विरोधकांचा सरकारवर घणाघात; पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांची दमछाक!

mahaanewslive by mahaanewslive
July 10, 2026
in यशोगाथा, सामाजिक, महाराष्ट्र, मुंबई, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, व्यक्ती विशेष, Featured
0
मूठभर विरोधकांचा सरकारवर घणाघात; पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांची दमछाक!

स्वप्निल ढवळे : महान्यूज लाईव्ह

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध जनहिताच्या प्रश्नांवरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. संख्याबळाच्या तुलनेत कमी असतानाही विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत सरकारला अनेक मुद्द्यांवर बचावात्मक भूमिका घ्यायला भाग पाडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सभागृहात जयंत पाटील, अनिल परब, सतेज पाटील, अंबादास दानवे, भास्कर जाधव, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे यांच्यासह इतर विरोधी सदस्यांनी विविध विषयांवर सरकारला सातत्याने घेरण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रश्नांवर मंत्र्यांना सविस्तर उत्तरे देताना अडचणींचा सामना करावा लागल्याचे चित्र अधिवेशनादरम्यान दिसून आले.

अधिवेशनातील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सभागृहात अनुपस्थित असल्याचा मुद्दा ठरला. या विषयावर सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही बाजूंनी नाराजी व्यक्त करण्यात आली. अध्यक्ष आणि सभापती यांनी वारंवार सूचना करूनही काही महत्त्वाच्या चर्चांदरम्यान संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदविले. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

पेपरफुटी, दूध भेसळ, पिक विमा, कायदा व सुव्यवस्था, एमपीएससी परीक्षांशी संबंधित प्रश्न, शेतकरी कर्जमाफी, विविध कथित आर्थिक गैरव्यवहार तसेच इतर जनहिताच्या विषयांवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. या मुद्द्यांवर सरकारची भूमिका समाधानकारक नसल्याचा आरोप विरोधकांनी सभागृहात केला तर सरकारने आपल्या बाजूने विविध उपाययोजना सुरू असल्याचे सांगत आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला.

अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यानही विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. काही मंत्र्यांची उत्तरे विषयाला धरून नसल्याची टीका विरोधी सदस्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरांवरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित करत सरकार बचावात्मक झाल्याचा दावा केला. २०० हून अधिक आमदारांचे संख्याबळ असलेल्या सत्ताधारी पक्षाला विरोधकांनी सातत्याने प्रश्नांच्या भडिमाराने घेरल्याचे चित्र या अधिवेशनात पाहायला मिळाले.

प्रशासकीय यंत्रणा, जनहिताचे प्रश्न आणि सरकारच्या निर्णयक्षमतेवरून झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हे अधिवेशन राजकीयदृष्ट्या विशेष गाजले. एकंदरीत संख्याबळ कमी असतानाही विरोधकांनी आक्रमक संसदीय रणनीती अवलंबत सरकारवर सातत्याने दबाव निर्माण केला तर सरकारने आपल्या निर्णयांचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.

Next Post
दौंडमध्ये गावठी पिस्तूलचा सुळसुळाट! पाटसमध्ये आणखी एकाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

दौंडमध्ये गावठी पिस्तूलचा सुळसुळाट! पाटसमध्ये आणखी एकाला अटक; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group