• Contact us
  • About us
Sunday, July 5, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मजूरीपासून ज्या इमारतीत इलेक्ट्रिक फिटींगपर्यंतची कामं..त्याच बारामती न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदापर्यंत…! संघर्ष, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी कहाणी!

mahaanewslive by mahaanewslive
July 5, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
मजूरीपासून ज्या इमारतीत इलेक्ट्रिक फिटींगपर्यंतची कामं..त्याच बारामती न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदापर्यंत…! संघर्ष, जिद्द आणि यशाची प्रेरणादायी कहाणी!

अॅड शुभम निंबाळकर, इंदापूर

काही व्यक्तींचं आयुष्य हे फक्त त्यांचं वैयक्तिक यश नसतं; ते संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी आशेचा किरण आणि प्रेरणेचा दीपस्तंभ ठरतं. बारामती वकील संघटनेच्या बिनविरोध अध्यक्षपदी ॲड. सचिन वाघ यांची झालेली निवड ही अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची साक्ष आहे.

आज ज्या भव्य जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत ते अध्यक्ष म्हणून नेतृत्व करणार आहेत, त्याच इमारतीच्या उभारणीच्या काळात त्यांनी इलेक्ट्रिकल कामगार म्हणून विद्युत फिटिंगचे काम केले होते. फॅन, ट्यूबलाईट, वायरिंग आणि इतर इलेक्ट्रिकल फिटिंग करत त्यांनी त्या इमारतीच्या उभारणीत आपले श्रम दिले होते. त्या वेळी त्यांच्या हातात साधनं होती, अंगावर घाम होता; पण मनात एक अढळ स्वप्न होतं—”एक दिवस याच न्यायालयात काळा कोट परिधान करून न्यायासाठी लढायचं.”

परिस्थिती प्रतिकूल होती. आर्थिक अडचणी होत्या. अनेक संकटे होती. मात्र स्वप्नांवरचा विश्वास कधीही डळमळला नाही. अथक परिश्रम, शिक्षणाची जिद्द आणि स्वतःच्या कर्तृत्वावर असलेल्या विश्वासाच्या बळावर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि सन २००६ मध्ये बारामती येथे वकिली व्यवसायाची सुरुवात केली.

वकिलीच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येक दिवस ही एक नवी परीक्षा होती. प्रत्येक खटला, प्रत्येक युक्तिवाद आणि प्रत्येक आव्हान स्वीकारत त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्ती, निर्भीड मांडणी, प्रामाणिक काम आणि सहकाऱ्यांशी जपलेल्या विश्वासाच्या नात्यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली…आणि मग आला आयुष्यातील तो सुवर्णक्षण.

ज्या न्यायालयाच्या इमारतीत कधीकाळी इलेक्ट्रिकल कामगार म्हणून त्यांनी फॅन, ट्यूबलाईट आणि विद्युत फिटिंगचं काम केलं होतं, त्याच इमारतीतील बारामती वकील संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. हा केवळ एका पदाचा सन्मान नाही; हा संघर्षावर मिळालेला विजय, कष्टांचं फळ आणि जिद्दीचा सर्वोच्च सन्मान आहे.

ही कहाणी आपल्याला शिकवते की परिस्थिती माणसाचा वर्तमान ठरवू शकते, पण त्याचं भविष्य नाही. भविष्य घडवत असतात त्याची स्वप्नं, त्याची मेहनत, त्याची चिकाटी आणि स्वतःवरचा अढळ विश्वास. ॲड. सचिन वाघ यांचा प्रवास प्रत्येक तरुणाला एकच संदेश देतो, संघर्ष हा यशाचा शत्रू नसतो; तोच यशाचा पाया असतो. स्वप्न मोठं असेल, जिद्द प्रामाणिक असेल आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर नियतीही एक दिवस तुमच्या यशासाठी टाळ्या वाजवते.

खरंच, माणूस कुठून सुरुवात करतो यापेक्षा, तो आपल्या कर्तृत्वाने कुठपर्यंत पोहोचतो हेच त्याच्या आयुष्याचं खरं मोजमाप असतं. आता बारामती वकील संघटनेच्या बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली. ॲड. सचिन वाघ यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन अशासाठी की, ही केवळ एका वकिलाची यशोगाथा नाही… तर प्रत्येक संघर्ष करणाऱ्या माणसाच्या स्वप्नांना नवी दिशा देणारी आणि मेहनतीचं फळ एक ना एक दिवस नक्की मिळतं याची जिवंत साक्ष आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

स्टिंग पेयावर राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; शाळांपासून अर्धा किलोमीटर परिसरात विक्रीस बंदी

July 3, 2026
वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

वाई-पाचगणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक दरड कोसळली!

July 3, 2026
दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणारे तिघे जेरबंद! शिक्रापूर पोलिसांची कारवाई; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

July 3, 2026

ग्वाल्हेरमध्ये पाच महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या लड्डू गोपालच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नियुक्त

July 3, 2026
बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

बारामती नगरपरिषदेला अत्याधुनिक सीवर सक्शन- जेटिंग- डीवॉटरिंग मशीन; स्वच्छता व्यवस्थेला मिळणार नवे बळ!

July 2, 2026
बारामतीच्या ग्रामीण भागात दररोज ४ तास भारनियमन; नागरिक त्रस्त, संताप वाढला!

महावितरणच्या नव्या स्मार्ट मीटरविरोधात ४ जुलै रोजी इंदापूर बंदचे आवाहन!

July 2, 2026
मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

मांढरदेव घाट बनतोय मृत्यूचा सापळा; अपूर्ण रस्त्यामुळे भाविकांत संताप

July 2, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

दौंडच्या खुटबावमधील दुहेरी खून प्रकरण! आरोपीला बारामती सत्र न्यायालयाची जन्मठेप!

July 2, 2026
26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

26 वर्षाच्या कालखंडानंतर बारामती बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप सेवानिवृत्त! सेवानिवृत्ती निमित्त विशेष सत्कार!

July 2, 2026
बारामतीत मोठी फसवणूक उघड? बिग बुल ट्रेडिंग कंपनीविरोधात गुन्हा; गुंतवणूकदारांना पुढे येण्याचे पोलिसांचे आवाहन!

इंदापूर नगरपरिषदेसमोर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला; प्रसंगावधानामुळे बचाव, एक जखमी

July 2, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group