मुंबई :महान्युज लाईव्ह
मराठीचा आग्रह धरल्याने अपमानास्पद वागणूक मिळाल्याने लेखिका शोभा देशपांडे यांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. २० तासानंतर मुजोर सराफानं अखेर त्यांची माफी मागितली आहे.
मला मराठी बोलता येतं, माझा जन्म मुंबईतच झाला आहे, मला माफ करा, असं सांगत महावीर ज्वेलर्सचा मालक शंकरलाल जैन याने शोभा देशपांडे यांची माफी मागितली.
मनसेचे कार्यकर्त्यांनी दणका दाखवल्यानंतर हा सराफ वठणीवर आला. शोभा देशपांडे काल रात्रभर फूटपाथवरच होत्या. सकाळी संदीप देशपांडे घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस एका गाडीतून ज्वेलरला घेऊन घटनास्थळी आले. त्यानंतर त्याने माफी मागितली, यावेळी मनसेसैनिक आक्रमक झाले होते.











