महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
आज पुण्यात कोरोनाच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या अजित पवार यांनी जिल्हा परीषदेच्या अॅग्रो अॅंम्ब्युलन्सचे उदघाटन केले, तेव्हा माहिती देत असताना एका अधिकाऱ्याने तोंडावरील मास्क खाली घेतल्याचे पाहताच मास्क घेऊन बोलण्याची सूचना अजित पवार यांनी केली, तेव्हा सारेच चरकले.
गेल्या सहा महिन्यांपासून अजित पवार सतत कामासाठी बाहेर फिरत आहेत. मात्र कोरोनाच्या बाबतीत ते फार दक्ष आहेत. आपल्यामुळे इतरांना व इतरांमुळे आपल्यालाही त्रास होता कामा नये यासाठी ते अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनाही लांबूनच बोलण्याचा आग्रह धरतात. शिवाय वाहनातही आतापर्यंत अनेक जण बसण्यासाठी गडबड करायचे, कोरोना आल्यापासून अजितदादांच्या गाडीत अजितदादांशिवाय कोणीच नसते.
आज अजितदादांच्या हस्ते पुण्यात जिल्हा परीषदेच्या अन्न, पाणी व देठ तपासणीच्या फिरत्या प्रयोगशाळेचे लोकार्पण झाले. त्यावेळी त्यचे परीक्षण कसे होणार आहे, याची माहिती पवार घेत होते. त्यावेळी एका अधिकाऱ्याने त्यांना ही माहिती सांगताना मास्क खाली घेतला, तेव्हा अजितदादांनी एकदम दरडावून ए मास्क वर घेऊन बोल असा एकदम त्यांच्या शैलीत आवाज टाकला आणि सारेच हादरले.











