• Contact us
  • About us
Friday, June 19, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलीस अधिकाऱ्याने मुलाला थेट जिल्हा परिषद शाळेत दाखल केलं.. मराठी शाळांवरील विश्वासाचा आदर्श संदेश!

mahaanewslive by mahaanewslive
June 16, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
पोलीस अधिकाऱ्याने मुलाला थेट जिल्हा परिषद शाळेत दाखल केलं.. मराठी शाळांवरील विश्वासाचा आदर्श संदेश!

सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसारे यांचा प्रेरणादायी निर्णय; बोरकरवाडी जिल्हा परिषद शाळेत मुलाचा प्रवेश

सचिन पवार : महान्यूज लाईव्ह

सुपे : आजच्या स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या किंवा महागड्या खासगी शाळेत शिक्षण मिळावे यासाठी पालकांची धडपड सुरू असते. मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्याची तयारी असताना मराठी माध्यमाच्या आणि जिल्हा परिषद शाळांकडे मात्र अनेकदा दुय्यम नजरेने पाहिले जाते. अशा परिस्थितीत सुपे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे यांनी आपल्या मुलाचा प्रवेश इंग्रजी शाळेत न घेता थेट जिल्हा परिषद शाळेत करून एक आदर्श निर्माण केला आहे.

भारतीय संस्कृती, मातृभाषा आणि सुसंस्कारांचे महत्त्व जपत नवसारे दांपत्याने आपला मुलगा विराज नवसारे याचा प्रवेश बारामती तालुक्यातील बोरकरवाडी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीमध्ये घेतला. शासनाकडून दरवर्षी ‘मराठी शाळा वाचवा’, ‘जिल्हा परिषद शाळा वाचवा’ अशा घोषणा दिल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष कृतीतून संदेश देणारे लोक फारच कमी दिसतात. अशावेळी एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्याने आपल्या कृतीतून मराठी शिक्षणावरील विश्वास व्यक्त केल्याने या निर्णयाचे कौतुक होत आहे.

आज राज्यातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी, प्रशासकीय सेवांमधील अधिकारी, शिक्षक, डॉक्टर आणि विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्ती मराठी माध्यमातूनच शिक्षण घेत पुढे आल्या आहेत. हे वास्तव असतानाही पालकांमध्ये इंग्रजी माध्यमाबाबतचे आकर्षण वाढत चालले आहे. अशा पार्श्वभूमीवर मनोज नवसारे यांनी घेतलेला निर्णय मराठी शाळांच्या गुणवत्तेबाबत सकारात्मक संदेश देणारा आणि जिल्हा परिषद शाळांवरील विश्वास अधिक दृढ करणारा ठरत आहे.

विराज नवसारे याच्या प्रवेशावेळी बारामती पंचायत समितीच्या सदस्या उज्वला खैरे, बारामती तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पोपट खैरे, कुतवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच रूपाली भोसले, उपसरपंच दीपाली बोरकर, ग्रामपंचायत सदस्य भानुदास बोरकर, राणी बोरकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष बोरकर, पालक श्रीरंग बोरकर, शरद बोरकर, शंकर बोरकर, रोहिदास बोरकर, मीरा बोरकर, सारिका बोरकर, सोनाली बोरकर तसेच शिक्षक शहाजी कुंभार आणि कुतवळ मॅडम उपस्थित होते.

मराठी शाळांबाबत समाजात सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शासकीय शाळांवरील विश्वास वाढविण्यासाठी मनोज नवसारे यांचा हा निर्णय निश्चितच प्रेरणादायी ठरणारा असून, मराठी शाळांचे अस्तित्व टिकविण्याच्या चळवळीला बळ देणारा आहे. त्यांच्या या कृतीमुळे “बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ” हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

Next Post
चक्क पोलिसालाही गंडा घातला तो ज्वालामुखीचा दगड..! 

चक्क पोलिसालाही गंडा घातला तो ज्वालामुखीचा दगड..! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

एअर इंडियाच्या या इमारतीतून मंत्रालय चालणार! नवा विस्तार देईल विखुरलेल्या विभागांना नवी गती!

June 18, 2026
माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

माळेगाव सहकारी साखर कारखान्यात मिल रोलर पूजन; गळीत हंगाम २०२६-२७ च्या तयारीला वेग

June 18, 2026
एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

एका रात्रीत दौंड तालुक्यात ५ ठिकाणी दरोडे टाकले.. टोळी जेरबंद; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त, २० गंभीर गुन्हे उघड!

June 18, 2026
दौंड पुन्हा हादरले! गर्भपात प्रकरणात केडगावच्या डॉ. स्वाती लवंगारे यांच्यावर गुन्हा दाखल!

बेकायदेशीर लिंग निदान व गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; महिला डॉक्टरला १९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!

June 18, 2026
थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

थप्पड से डर नहीं लगता साहब, लेकीन प्यार से डर लगता है..!

June 18, 2026
बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

बारामतीचे ते चौघे.. संभाजीनगर मधल्या पंपावरच्या गर्दीत.. मग डिझेल कसे मिळाले? अर्थात दादा सांगतील तसं..!

June 18, 2026
अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

अनबाउंड’ची खडतर वाट.. अमेरिकेत १७१ किमी सायकल शर्यत पूर्ण करणारे पुण्याचे  सूरज कुडतरकर एकमेव ज्येष्ठ भारतीय!

June 17, 2026
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे

June 17, 2026
बारामती शहर पोलिसांची गोवंश वाहतुकीवर धडक कारवाई; दोन पिकअपसह चार जनावरे ताब्यात

गोमातेला राष्ट्रीय पशूचा दर्जा द्या.. गोमातेची हत्या रोखा आणि म्हैस, रेड्याच्या मांसावरून होणारी तथाकथित ब्लॅकमेलिंगही रोखा..  बारामतीत कुरेशींचे तीन दिवसांचे धरणे आंदोलन!

June 17, 2026
महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६ : माहितीच्या अधिकारावर अभूतपूर्व घाला घातला गेलाय.. सावध व्हा! 

June 17, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group