• Contact us
  • About us
Thursday, September 17, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाईत लघु कुंभमेळा! ऑस्ट्रेलियन नागरिकांनीही घेतला आध्यात्मिक सोहळ्याचा अनुभव; कृष्णाघाट परिसर भक्तिमय!

tdadmin by tdadmin
May 25, 2026
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, मनोरंजन, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, व्यक्ती विशेष, Featured
0
वाईत लघु कुंभमेळा! ऑस्ट्रेलियन नागरिकांनीही घेतला आध्यात्मिक सोहळ्याचा अनुभव; कृष्णाघाट परिसर भक्तिमय!

दौलतराव पिसाळ, वाई
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई नगरीत आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून संपूर्ण कृष्णाघाट परिसर सध्या भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमामुळे वाई शहरात आध्यात्मिक ऊर्जा, सांस्कृतिक वैभव आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.

कृष्णा नदीच्या तीरावर उभारण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई, मंत्रोच्चार, ढोल-ताशांचा गजर, साधू-संतांचा वावर आणि संध्याकाळी होणारी भव्य कृष्णा आरती यामुळे घाट परिसराला एक वेगळेच आध्यात्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे. हरिद्वारच्या गंगा आरतीच्या धर्तीवर होत असलेली कृष्णा आरती हे या मेळ्याचे प्रमुख आकर्षण ठरत असून आरतीवेळी निर्माण होणारे भक्तिमय वातावरण भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे.

या लघु कुंभमेळ्यासाठी उज्जैन, हरिद्वार, हिमाचल प्रदेश आणि गुजरात येथून नागा साधू दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे मेळ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधिकच वाढले आहे. विविध धार्मिक विधी, होम-हवन, पूजा-अर्चा, भजन-कीर्तन आणि सत्संग कार्यक्रमांमुळे भाविकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. नागा साधूंचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून घाट परिसरात दिवसभर भक्तांची रेलचेल सुरू असल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियातून आलेल्या नागरिकांनीही या लघु कुंभमेळ्यात सहभाग घेत भारतीय संस्कृती आणि हिंदू धार्मिक परंपरेचे कौतुक केले. ऑस्ट्रेलियातील पीटर यांनी सांगितले की, “मला हा भक्तिमय आणि सांप्रदायिक कार्यक्रम पाहण्याचे भाग्य लाभले. येथे येण्यापूर्वी मी दोन दिवस मांसाहार आणि मद्यपान केले नाही. हिंदू संस्कृती, मंदिरांचे वैभव, घाट परिसर आणि येथील भक्तिमय वातावरण मला खूप भावले. संत-महंतांचे दर्शन घेण्याची संधी मिळाली आणि वाईकरांनी दिलेल्या प्रेमामुळे मी भारावून गेलो.”

शुक्रवारी शहरात जोरदार पाऊस होऊनही भाविकांचा उत्साह कमी झालेला दिसला नाही. मुसळधार पावसातही हजारो भाविकांनी कृष्णाघाट परिसरात उपस्थिती लावून धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेतला. घाट परिसरातील मंदिरे, साधू-संतांचे दर्शन आणि विविध धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेरगावाहून आलेल्या भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

दररोज तब्बल २० ते २५ हजार भाविक या लघु कुंभमेळ्यास उपस्थित राहत असल्याचे चित्र असून महिला भगिनी, संत मंडळी, विविध सामाजिक संस्था, आयोजक आणि प्रायोजक यांच्या सक्रिय सहभागामुळे मेळ्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. वाईकर जनतेनेही या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात हा लघु कुंभमेळा महाराष्ट्रातील एक मोठे धार्मिक आकर्षण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी सांगितले की, पुढील तीन वर्षांत हा लघु कुंभमेळा आणखी भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार असून महाराष्ट्र शासनाकडून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमार्फत मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे तसेच तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांचे मोठे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सुधीर वाळुंज आणि अमोल गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २०० ते २५० पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून गर्दीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Next Post
चालकच निघाला खोबरे चोर! अपघाताचा बनाव रचला, 6.68 लाखांचे खोबरे लंपास केले! चार जणांना दौंड मध्ये अटक!

चालकच निघाला खोबरे चोर! अपघाताचा बनाव रचला, 6.68 लाखांचे खोबरे लंपास केले! चार जणांना दौंड मध्ये अटक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group