• Contact us
  • About us
Thursday, May 28, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजितदादांच्या स्मृती चिरंतन जपायच्यात, तुमच्याकडे एचडी फोटो अथवा व्हिडिओ आहेत? प्लीज येथे पाठवा! अजितदादांच्या कार्यालयाचे आवाहन!

tdadmin by tdadmin
February 17, 2026
in यशोगाथा, मुंबई, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
अजितदादांच्या स्मृती चिरंतन जपायच्यात, तुमच्याकडे एचडी फोटो अथवा व्हिडिओ आहेत? प्लीज येथे पाठवा! अजितदादांच्या कार्यालयाचे आवाहन!

बारामती : महान्यूज लाईव्ह

महाराष्ट्राच्या राजकारणात “कामाचा माणूस” अशी ओळख निर्माण करून आपल्या कार्याचा अढळ ठसा उमटवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवनप्रवासातील अनमोल क्षण जतन करण्यासाठी एक भावपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्य, निर्णयक्षमता, प्रशासनातील पकड आणि जनतेशी असलेले स्नेहबंध यांचे दस्तऐवजीकरण व्हावे, या उद्देशाने छायाचित्रे आणि चित्रफिती संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ अजितदादांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अथक परिश्रम घेतले. पहाटे सहा वाजल्यापासून सुरू होणारी त्यांची कामाची धावपळ रात्री उशिरापर्यंत अखंड सुरू असायची. मंत्रालयातील बैठका, जिल्हा दौर्‍यांदरम्यान घेतलेले आढावे, विकासकामांची पाहणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची त्यांची कार्यशैली विशेष ठरली. विकासासाठीची त्यांची तळमळ आणि निर्णयक्षम नेतृत्व यामुळे राज्यातील विविध पायाभूत प्रकल्पांना गती मिळाली.

अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडे, सहकाऱ्यांकडे, स्नेहीजनांकडे आणि मित्रपरिवाराकडे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील अनेक संस्मरणीय क्षण छायाचित्रे किंवा व्हिडिओच्या स्वरूपात जतन झालेले असतील. या सर्व आठवणी एकत्रित करून त्यांचा समृद्ध असा ऐतिहासिक दस्तऐवज तयार करण्याचा मानस आहे. त्यामुळे राज्यातील तसेच राज्याबाहेरील त्यांच्या चाहत्यांना आणि समर्थकांना त्यांच्या कार्याचा प्रवास पुन्हा अनुभवता येईल.

आपल्याकडे उपलब्ध असलेली एचडी गुणवत्तेतील छायाचित्रे व चित्रफिती कृपया ourdada@viitindia.org या ई-मेल आयडीवर पाठवावीत किंवा अधिक माहितीसाठी ८८७९८८७००९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवा व संपर्क करा!

या उपक्रमामुळे अजितदादांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचे जतन भावी काळासाठी होईल. त्यांच्या कार्याचा ठसा इतिहासात अधिक ठळकपणे उमटावा आणि त्यांच्या आठवणी चिरंतन राहाव्यात, यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे यांनी केले आहे.

Next Post
शिवनगर विद्या प्रसारक मंडळातील प्राध्यापक अडचणीत; ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल!

बारामतीच्या हनीट्रॅपचा प्रताप! अखेर पल्लवी जाधव व प्रताप जाधव या बंटीबबलीचा पापाचा घडा भरला! पुण्यात महिलेवर अत्याचार व खंडणीच्या गुन्ह्यानंतर दोघांना अटक! वकीलही होता दिमतीला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

बॉम्बस्फोट होईल; काळजी घ्या..!सहा वर्षांच्या चिमुकल्याचं पत्र आणि राजीव गांधींचं उत्तर; डॉ. अमोल अन्नदाते यांनी सांगितली भावूक आठवण

May 21, 2026
चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

May 21, 2026
आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

May 21, 2026
बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

बारामतीतील प्रशासकीय भवनातील लिफ्ट अनेक दिवसांपासून बंद; वृद्ध,दिव्यांग नागरिकांचे हाल

May 21, 2026
आजही बारामती तालुक्यात आमदार रोहित पवार व जय पवार यांचा गावभेट दौरा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंध; २२ आमदारांच्या संपर्काच्या बातम्या निराधार – उमेश पाटील

May 21, 2026
बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

बारामतीच्या महालक्ष्मी ऑटोमोटिव्हज’ने आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला ठसा

May 21, 2026
बारामतीत टर्मिनची इंजेक्शन्स सर्रास घेतली जाताहेत.. कुठला आनंद शोधताय मुलांनो? या घातक गोष्टींपासून वेळीच दूर रहा..

दौंड, केडगावसह तालुक्यात गर्भलिंग निदान व गर्भपाताचे रॅकेट सक्रीय! डॉक्टर, एजंट मोकाट! मग काय कारवाईवर फक्त प्रश्नचिन्ह?

May 21, 2026
बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

बोरीपार्धी येथे २२ मे रोजी संयुक्त महामानव जयंती सोहळा ! माजी खासदार छत्रपती संभाजीराजे लावणार उपस्थिती!

May 21, 2026
फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

फलटणच्या विशेष सभेत मोठा निर्णय; श्रीराम कारखाना आता श्री दत्त इंडियाकडे!

May 21, 2026
कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

कॉक्रोच जनता पार्टीची देशभरात हवा ! फक्त ५ दिवसात ९० लाख फॉलोवर्स! सत्ताधारी भाजपलाही टाकले मागे!

May 21, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group