• Contact us
  • About us
Wednesday, September 2, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीच्या हनीट्रॅपचा प्रताप! अखेर पल्लवी जाधव व प्रताप जाधव या बंटीबबलीचा पापाचा घडा भरला! पुण्यात महिलेवर अत्याचार व खंडणीच्या गुन्ह्यानंतर दोघांना अटक! वकीलही होता दिमतीला!

tdadmin by tdadmin
February 17, 2026
in सामाजिक, सुरक्षा, महिला विश्व, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
शिवनगर विद्या प्रसारक मंडळातील प्राध्यापक अडचणीत; ‘पोस्को’अंतर्गत गुन्हा दाखल!

पुणे : महान्यूज लाईव्ह 

व्याजाने घेतलेली रक्कम पूर्णपणे परत करूनही एका २८ वर्षीय महिलेचा छळ करत तिच्यावर अत्याचार करून अश्लील व्हिडिओ तयार केल्याचा आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकल्याचा संतापजनक प्रकार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली असून एका वकिलासह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे प्रताप रमेश जाधव (वय ४५) आणि पल्लवी दादासो कारंडे उर्फ पल्लवी प्रताप जाधव (वय २८, दोघे रा. भिंताडेनगर, सिंहगड कॅम्प) अशी आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जून २०२४ पासून आतापर्यंत सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी पल्लवी जाधव या एकमेकींच्या परिचयातील आहेत. आर्थिक गरजेतून फिर्यादीने प्रताप जाधव याच्याकडून सुमारे अडीच लाख रुपये व्याजाने घेतले होते. संबंधित रक्कम व्याजासह परत करण्यात आली होती. मात्र, पैसे परत करूनही आरोपींकडून वारंवार पैशांची मागणी करून मानसिक त्रास दिला जात होता.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, पल्लवी घरात नसताना प्रताप जाधव याने तिच्यावर जबरदस्ती केली. या प्रकारानंतर ती पोलिसांकडे जाण्याच्या तयारीत असताना आरोपी पती-पत्नीने पुन्हा पैशांसाठी दबाव टाकला. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पल्लवीने प्रतापला उचकावले. पल्लवी ही प्रताप याला ‘‘प्रताप हिची मस्ती जिरव’’ असे म्हणाली. तेव्हा पल्लवी घरात असताना प्रताप याने फिर्यादी हिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दोघांनी मिळून महिलेवर पुन्हा अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

आरोपींनी पीडितेचे कपडे बदलतानाचे फोटो व व्हिडिओ चित्रीत केल्याचा आरोप असून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. याचबरोबर बारामतीतील एका उद्योजकाविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी महिलेवर दबाव टाकण्यात आला. तसे केल्यास २० ते २५ लाख रुपये आणि बारामतीतील एक फ्लॅट देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे. पिडितेने नकार दिल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रताप जाधव आणि पल्लवी जाधव यांना अटक केली. एका वकिलासह इतर पाच जणांविरुद्धही विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक व्यवहाराच्या निमित्ताने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Next Post
भिगवणमध्ये भरदिवसा थरारक अपहरण; आई-भावाच्या डोळ्यात मिरची फेकून तरुणीला दोन मुसलमान तरुणांनी पळवले..! परिसरात तणाव!

भिगवणमध्ये भरदिवसा थरारक अपहरण; आई-भावाच्या डोळ्यात मिरची फेकून तरुणीला दोन मुसलमान तरुणांनी पळवले..! परिसरात तणाव!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

पालखी मार्गावरील अपघात : मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; जखमींवर मोफत उपचाराची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सूचना!

July 13, 2026
पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

पालखी मार्गावर कसा झाला भीषण अपघात? ट्रकखाली कसे चिरडले वारकरी?

July 13, 2026
जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

जेजुरीजवळ भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू, तीन जखमी

July 13, 2026
शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

शॅम्पूपासून दूध, डिटर्जंटचा फेस अन् आरोग्याशी खेळ; फलटण तालुक्यातील होळमध्ये FDAचा दणका!

July 13, 2026
उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

पुणे जिल्ह्यातील बावडा, सणसरसह चार मंडळ महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; बोगस व अनियमित नोंदी प्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई

July 12, 2026
मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ९ कामगारांना जीव गमवावा लागला..जखमी कामगारांची सुप्रिया सुळेंकडून रुग्णालयात भेट; निष्काळजीपणाला जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी!

July 12, 2026
आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीच्या संघर्षाची यशोगाथा

July 12, 2026
नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

नववीतील विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म; नाशिकमधील आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार!

July 11, 2026
बारामती तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची रणधुमाळी; १२ जून रोजी सदस्य आरक्षण सोडत!

SIR आणि गुरुजी आडवे आले? १३ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर?  मतदार पुनरीक्षण (SIR) मुळे जानेवारीनंतरच बिगुल वाजण्याचे संकेत!

July 11, 2026
बारामतीतील सायबर गुन्हेगारीची चौथी घटना! आणखी दोघांची 68 लाखाची फसवणूक!

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला; सहा जणांसह इतरांविरुद्ध गुन्हा, कठोर कारवाईचा इशारा

July 10, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group