• Contact us
  • About us
Tuesday, September 15, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जेव्हा साहेबांचे ‘पीए’ अजितदादांच्या ‘पीए’चे कौतुक करतात…

Maha News Live by Maha News Live
October 3, 2020
in यशोगाथा, सामाजिक, मराठवाडा, राजकीय, राज्य, लाईव्ह, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0

महान्यूज लाईव्ह रिपोर्ट

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांचे लेखन म्हणजे सुलभरित्या समोरील गोष्टींचा घेतलेला धांडोळा असतो.. सहजसोप्या भाषेमुळे तो गोडवा अधिक काळ मनावर रुंजी घालतो.. त्यातून त्यांच्या लिखाणातून अनेक माणसं कळत जातात.. आता त्यांनी अजितदादांच्या पीए वर सहजगत्या लिहीलेले प्रेमाचे दोन शब्द सुनीलकुमार मुसळे यांचे कार्यालयीन कामकाज तर उलगडून गेलीच, मात्र कामातील दक्षपणाचे कौतुकही उठावदार होऊन गेले.

राज्य असो की, केंद्र असो, मंत्र्यांचे पी.ए. म्हणजे स्वीय सहायकांचा तोराही कसा असतो हे सर्वांना माहिती आहे.. त्यांची किती मनधरणी करावी लागते हेही सर्वांना माहिती आहे..शिवाय एक पीए दुसऱ्या पीएचा दुस्वास करीत असतो, हेही अनेकदा राज्यातही पाहायला मिळाले आहेच की.. पण
अपवाद आहे, पवार कुटुंबियांचा.. या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या पी.ए.चा तोरा नसतो…त्यांना अहर्निशं सेवामहं आणि सदैव दक्ष राहावे लागते… सर्वांचीच तीच स्थिती असते.. एकमेकांकडे लक्ष द्यायलाही या सहायकांना वेळ नसतो.. सतत कामात गढून गेलेले असतात हे लोक..!

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे स्वीय सहायक सतीश राऊत यांनी अजितदादांचे पीए सुनीलकुमार मुसळे यांच्याविषयी दोन शब्द लिहीलेले आहेत. ते दोन शब्द त्यांच्याच शब्दात…

राऊतसाहेब लिहीतात, अजितदादा हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेले नाव ! दादांच्या आवाजातली जरब आणि वागण्यातला दरारा भल्या -भल्यांची भंबेरी उडवतो. वक्तशीरपणा , करडी शिस्त आणि स्वच्छता- टापटीपीची सवय हे त्यांच्यातील गुण जनमाणसांवर प्रभाव पाडतात आणि प्रशासनावर मजबूत पकड ठेवतात . ‘द मॅन व्हू परफॅार्मस & डिलीव्हर्स’ अशी त्यांची ख्याती आहे .

बरं हे सगळं प्रत्यक्षात पार पडण्यासाठी त्यांच्या खासगी स्टाफची पण मोठी कसरत होत असावी असे मला कायम वाटते. ‘सदा सज्जता’ हे ब्रीद मनात बाळगूनच त्यांना काम करावे लागत असावे. दादा आमच्या साहेबांकडे आले की मी त्यांच्या पी.ए. मंडळींकडे नेहमी उत्सुकतेने पाहत असतो. कायम सावधान अवस्थेत असणारे त्यांचे पी.ए. आपले अवधान लगेच खेचतात. त्यांचे डोळे आणि कान सतत दादांकडे लागून असतात.

लढाईच्या मैदानात उतरायचं म्हटलं तर तलवार विसरून कसे चालेल ? दादांचे सैनिक मात्र सगळ्या शस्त्रांनिशी तयार असतात आणि ते ही अगदी जवळ ! मी नेहमी विनोदाने म्हणतो की दादांचे पी.ए. हाताच्या अंतरावर असतात तर आम्ही मात्र हाकेच्या अंतरावर असले तरी चालते !

आज मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूट मध्ये सुनीलकुमार मुसळेंची गाठ पडली . दादांचा पी.ए. असल्याच्या सिग्नेचर स्टाईल मध्ये ते होते ! शर्टाच्या खिशात नुसता पेन अडकवलेला नव्हता, तर त्याच्या सोबतीला पेनासारख्या दिसणाऱ्या पेन्सील आणि पिवळ्या रंगाचा हायलाईटर ह्या सवंगडयांनी गर्दी केली होती. मी ‘खोड रबर कुठे आहे ?’ विचारलं तर मुसळे पेन्सील बाहेर काढून टोपणाच्या वरच्या भागात डोकावणारा रबर दाखवत ‘ हा काय ?’ असे तत्क्षणीच उद्गारले !

मला त्यांची डायरी पाहण्यात मोह आवरेना ! मागणी करताच ती त्यांनी पुढ्यात ठेवली. डायरीचे मुखपृष्ठ उघडले की , त्याच्या मागील बाजूवर पांढऱ्या रंगांचे पाकीट चिकटवून कागदाच्या स्लिप ठेवण्यासाठी रकाना केल्याचे दिसले. वाटेत कधीही निरोप द्यायची वेळ आली की ते पाकीटातून स्लिप काढून तात्काळ निरोप लिहून देतात . इतर पी.ए. ना डायरीची मागील पाने फाडून चिठ्ठ्या बनवण्याची धडपड करताना मी बऱ्याचदा पाहिले आहे तर काहींना दुसऱ्यांकडे कोरा कागद मागताना पाहिले आहे. दादांच्या पी.ए.वर ही कागद याचना करण्याची कधीही वेळ येत नाही .

मी पुढची पाने उलटली नाहीत ! कारण त्यात डोकावण्याचा मला अधिकार नव्हता. मुसळेंनी माझी उत्सुकता ओळखली ! त्यांनी डायरीची शेवटची पाने उघडली. त्यात बुडापर्यंत कापलेल्या दसकटासमान कागदी कपटीवर पाच -पंचवीस टाचण्या खोचून ठेवलेल्या दिसल्या ; सोबत गुंतलेल्या यू-पीनांनी माझे लक्ष वेधले. पण माझी नजर लहानशी सुई आणि दोरा शोधत होती . काळाच्या ओघात सुई-दोरा , टॅग वगैरे लागत नसावेत !

नीट पाहिले नाही ! नाहीतर डायरीच्या पानात लपलेली पांढरी हाफ पट्टी हमखास दिसली असती. खिसा चाचपला असता तर तीन- चार रंगीत स्केचपेन , स्टेपलर , यलो स्लिपचे बंडल बाहेर काढता आले असते. मोबाईलमध्ये कालनिर्णय ॲप डाऊनलोड केलेले आढळले असते. मुसळे म्हणजे फोनची चालती -बोलती डिरेक्टरी आहे. डोनाल्ड ट्रम्पचा जरी मोबाईल मागितला तरी ते अर्ध्या तासात हुडकून देतील असे दादांचे मुंबईतले अनिल ढिकले पी.ए. मजेने सांगतात !

असो ! गंमतीचा भाग सोडला तर अजितदादांची पी.ए.मंडळी किती सतर्क आणि ऑर्गनाईज्ड असतात याची आपणाला कल्पना आली असेल ! जगात प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळतं ! मला देखील खूप काही शिकायला मिळतं अशा मंडळींकडून ! तुम्हालाही काही गोष्टी अनुकरणीय वाटतील. पी.ए. म्हटले की अशी माणसे मुर्तीमंतपणे माझ्या डोळ्यांसमोर उभी राहतात आणि आपल्याही राहतील !

पण हो ! हा लेख वाचल्यावर कुणी खिशात तीन पेन अडकवलेला दिसला की तो दादांचा पी.ए. असल्याची समजूत करून घेऊ नका म्हणजे झाले !

सतीश राऊत यांनी किती सहजपणे सुनीलकुमार मुसळे यांच्या कामासाठीच्या दक्षपणाची माहिती उलगडून दाखवली आहे? खरेतर सुनीलकुमार मुसळे हे बारामती, पुणेच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यांतील अनेकांना परिचित असलेले नाव.. हक्काने फोन करण्याचे ठिकाण… दादांच्या ऐवजी मुसळे यांचा जरी संपर्क झाला तरी कार्यकर्ते समाधानी..अशी गत असते. मुसळे यांचा कामातील दक्षपणाच नाही, तर आरोग्याच्या बाबतीत त्यांनी जीव ओतून केलेले कामही बारामतीकरांच्या स्मरणात दिर्घकाळ आहे. मात्र तरीदेखील सतीश राऊत यांच्याएवढा खोल विचार करून मुसळे यांचे बाह्यरंग ओळखण्याचा अजूनही कोणीही प्रयत्न केलेला नव्हता.. मुसळे यांना फोन केला की, १०८ची रुग्णवाहिका असो की, दवाखान्यातला डॉक्टर.. किंवा मंत्रालयातील अधिकारी किंवा जिल्ह्यातील एखाद्या शासकीय कार्यालयातील अडले, नडलेले काम असो.. ते मार्गी लागते हे माहिती असणाऱ्यांना देखील हा लेख नक्कीच मनात रुंजी घालेल…!

Next Post
भाऊ दादा, मामा…आता तरी उसाची बिले करा जमा…

भाऊ दादा, मामा...आता तरी उसाची बिले करा जमा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून पावसाळी अधिवेशन; सरसकट कर्जमाफी, दुष्काळाचे सावट, विषारी दारूकांड, वाढत्या गुन्हेगारीवरून सरकारची कसोटी

आरोग्य अधिकारी जसे काम करतील; तशाच प्रकारची त्यांना नियुक्ती व जबाबदारी मिळणार..! त्यांची कामगिरीच ठरवेल आरोग्य अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी; दरवर्षी होणार गुणांकन

September 7, 2026
सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

सावत्र बहिणीचे घर जाळल्याचा आरोपातील हवा असलेला आरोपी पहाटेच्या सापळ्यात जेरबंद..!

September 7, 2026
पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

पाच वर्षे वॉरंटला चकवा; अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात मारहाण व धमकीच्या २०२१ मधील गुन्ह्यात देवेंद्र घोडकेला अटक; न्यायालयीन कोठडी!

September 7, 2026
चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

चार दशकांनंतरही शिक्षकांच्या आठवणी ताज्या; १९८६च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक पोस्टकार्डांद्वारे व्यक्त केली कृतज्ञता..!

September 7, 2026
लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

लेकीसाठी अनवानी पायाने धावणाऱ्या माऊलीच्या मदतीला सचिन तेंडुलकरही सरसावला

September 7, 2026
साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

साखर कारखान्यांची धुराडी कधी पेटणार? ऑक्टोबर की नोव्हेंबरचा मुहूर्त; बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय

September 7, 2026
नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

नगराध्यक्षांच्या वित्तीय अधिकारांना कात्री; नमुना क्र. ६४ वर मुख्याधिकाऱ्यांचीच स्वाक्षरी

September 7, 2026
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिला महानायक – आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक!

September 7, 2026
दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

दिवे घाटातील अपघातातील गौरव चव्हाणच्या कुटुंबीयांची युगेंद्र पवार यांनी घेतली भेट!

September 6, 2026
उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

उद्या सोमवारी उजनीकाठच्या ४० गावात मच्छीमारांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..!

September 6, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group