डॉ. संदेश शहा : महान्यूज लाईव्ह
बारामती शहर व तालुक्यात आरोग्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या बारामती मेडिकल गिल्ड च्या सन २०२५ – २६ च्या अध्यक्षपदी डॉ. प्रदीप खलाटे तर सचिवपदी डॉ. नीलमकुमार शिरकांडे यांची निवड झाली.
संस्थेचे जेष्ठ सल्लागार डॉ. अशोक तांबे, डॉ. आर. पी. राजे, डॉ. रमेश भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी अध्यक्ष व नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. आशिष जळक, डॉ. चंद्रकांत पिल्ले यांची निवड करण्यात आली.
नव्या कार्यकारिणीची निवड पारदर्शक पद्धतीने झाली असून, डॉक्टरांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार नवीन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी संस्थेचे मावळते अध्यक्ष डॉ. राजेंद्र चोपडे तसेच सचिव डॉ. चंद्रकांत पिल्ले यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष डॉ. प्रदीप खलाटे तसेच सचिव डॉ. नीलमकुमार शिरकांडे यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे नूतन अध्यक्ष डॉ. प्रदीप खलाटे म्हणाले, डॉक्टर्स समुदायाच्या हितासाठी आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून त्यासाठी नव्या योजना संपूर्ण ताकदीने राबवू. सर्व रोग निदान शिबिराचा माध्यमातून आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम राबवू तसेच डॉक्टर व रुग्ण यांचे नातं चांगले राहण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देवू.
नूतन सचिव डॉ. शिरकांडे म्हणाले, “संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देवू. त्यासाठी सर्व डॉक्टरांनी होलिस्टिक पद्धतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यावेळी संघटनेचे खजिनदार डॉ. प्रशांत माने, डॉ. शीतल मेहता, डॉ. संदीप शहा, कार्यकारणी समिती सदस्य डॉ. रमेश भोईटे, डॉ. राजेंद्र चोपडे, डॉ. संजय पुरंदरे, डॉ. आर. एम. शहा तसेच संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.











