डॉ. संदेश शहा. इंदापूर
येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे येथील कंपनीच्या कॅम्पस ड्राइव्ह मध्ये कॉलेज मधील एकूण ४३ विद्यार्थ्यांची वार्षिक २ लाख ४० हजार पॅकेज सह प्रशिक्षणार्थी अभियंता म्हणून निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांनी दिली.
प्रशिक्षणार्थी अभियंता पदांसाठी ९१ पैकी ६३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, यामध्ये विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज मधून निवडलेल्या ४३ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थ्यांची ऑटोमोबाईल, २७ विद्यार्थ्यांची इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, १० विद्यार्थ्यांची मेकॅनिकल विभागातून निवड झाली आहे. त्यांच्या मुलाखती ११ मार्च रोजी कमिन्स इंडियाच्या कॅम्पस रिक्रूटर कीर्ती वांजानी, सेवा विश्लेषक बाळासाहेब गिरे आणि ऑपरेशन सुपरवायझर करण शिंदे यांनी घेतल्या होत्या.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले, कमिन्स इंडिया सारख्या आघाडीच्या कंपन्यांसोबत काम करण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांची निवड झाली.
कमिन्सच्या कॅम्पस रिक्रूटर कीर्ती वंजानी यांनी विद्यार्थ्यांचे तांत्रिक कौशल्य आणि योग्यतेबद्दल कौतुक केले.
कॉलेजचे प्लेसमेंट ऑफिसर प्रो. योगेश जाधव म्हणाले, कमिन्स इंडिया सोबतची भागीदारी आमच्या विद्यार्थ्यांना उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण आणि अनुभव मिळण्यासाठी महत्वाची ठरणार आहे. ते त्यांच्या करिअरसाठी चांगल्या प्रकारे तयार आहेत याची आम्हाला खात्री आहे.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. सोनाली काळे यांनी केले. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्या विश्वस्त, खासदार सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचे सर्व सदस्य, कॉलेज मधील ऑटोमोबाईल विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुनील शिंदे, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सोमनाथ चिकणे, मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. दिनेश सावंत यांनी नियोजन केले.











