डॉ. संदेश शहा, इंदापूर
इंदापूर वृक्ष संजिवनी परिवाराने नगरपरिषदेच्या सहकार्याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तळावरील ५०० झाडांना पाणी देऊन अनोख्या पद्धतीने रंगपंचमी साजरी केली. यानिमित्त झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देण्यात आला.
यावेळी वृक्ष संजिवनी परिवाराच्या संस्थापिका सायरा आत्तार म्हणाल्या, रंगपंचमी सण महाराष्ट्रात लहान मुलांपासून थोरा मोठयापर्यंत उत्साहाने रंग खेळून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्ण देखील झाडावर बसून आपल्या सवंगड्यासोबत रंग खेळायचे. कारण वृक्षांना देव मानून त्यांना पाणी मिळावे आणि त्यातून वृक्षाचे संवर्धन होऊन वनसृष्टी हिरवीगार व फुलांनी रंगबेरंगी होऊन पर्यावरणाचे रक्षण व्हावे, निसर्गाचे रक्षण व्हावे असा त्यांनी संदेश दिला. याची आठवण म्हणून आम्ही पर्यावरण संतुलन रहावे म्हणून हा अनोखा उपक्रम राबवला.
यावेळी रश्मी निलाखे, चंद्रकांत देवकर, अशोक अनपट, हमीद आत्तार, कृष्णा ताटे, प्रशांत गिड्डे, बाजीराव शिंदे, सुधाकर बोराटे, रविंद्र परबत, देवराव मते उपस्थित होते.











