• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काशीनाथाचं चांगभलं’ च्या गजरात बावधनचं बगाड!मिरवणूकीसाठी लाखो भाविकांची उपस्थिती!

tdadmin by tdadmin
March 20, 2025
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, प्रवास, व्यक्ती विशेष, Featured
0
काशीनाथाचं चांगभलं’ च्या गजरात बावधनचं बगाड!मिरवणूकीसाठी लाखो भाविकांची उपस्थिती!

दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : ‘काशीनाथाचं चांगभलं’ च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत साताऱ्यातील बावधन ( ता. वाई) येथील भैरवनाथाचे बगाड यात्रा उत्साहात पार पडली. सकाळी साडेअकराच्या सुमारास बगाड्याला बगाडावर चढवून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली.

मागील 4 वर्षापूर्वी बगाड यात्रा यात्रेवर काही बंधने आली होती. २०२० मध्ये टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच बगाड यात्रा झालेली होती. तर 2021 मध्ये यात्रेला करोना प्रादुर्भावामुळे बंदी घातलेली असतानाही गावकऱ्यांनी परंपरा खंडीत होण्याच्या भीतीने गनिमी काव्याने बगाड मिरवणूक काढून यात्रा साजरी केली होती. यामुळे कोरोनाचे कडक निर्बंध डावलून ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाची बगाड यात्रा साजरे करणारे बावधन गाव जगभरात प्रसिद्ध झाले होते.

बावधनकरांच्या याच श्रद्धेमुळे गेल्या 2-3 वर्षात महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर परराज्यातून हजारो भाविक यात्रेस भेट द्यायला येताहेत. यंदा बगाड मिरवणूक पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने यात्रेकरू जमा झाले होते. सर्व शिवार आणि रस्ते बगाड ओढणारे बैल आणि यात्रेकरू ग्रामस्थांच्या गर्दीने फुलून गेले होते.

होळी पौर्णिमेच्या दिवशी बावधन (ता वाई ) येथील भैरवनाथ मंदिरात यावर्षीचा बगाड्या निवडण्यासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमा झाले होते. यावर्षीचा बगाडाचा मान अजित बळवंत ननावरे यांना मिळाला होता. बगाड्या हा मागील पाच दिवसापासून ते गावातील सर्व मंदिरात पूजा करून मंदिरातच मुक्कामाला असतो. त्यानुसार ते मुक्कामाला होते. मंगळवारी रात्री बावधन येथे शेकडो ढोल ताशांच्या गजरात, गुलालाच्या उधळणीत मोठी शाही छबिना मिरवणूक निघाली. या छबिन्यात मोठ्या संख्येने ग्रामस्थ यात्रेकरू सहभागी झाले होते.
   

सकाळी बगाड्याला आणि बगाडाचा रथ कृष्णा नदीच्या तीरावर सोनेश्वर येथे आणण्यात आला. तिथे ग्रामदेवतेची पूजा झाल्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास बगाड्याला बगाडाला टांगण्यात आले. धष्टपुष्ट बैलांच्या मदतीने दगडी चाकांचा तीन चार टन वजनाचा बगाडाचा रथ बगाड बैलांच्या मदतीने ओढून बगाड मिरवणुकीला सुरुवात झाली. शिवार निहाय व तरफ निहाय ठिकठिकाणी दहा ते बारा बैल जुंपून बगाडाचा रथ शेत शिवारातून ओढून बावधन गावात भैरवनाथ मंदिराकडे आणला गेला.

बगाड रथाच्या मागे अन पुढे भैरवदेव देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ मंडळ बावधन यांच्या वतीने ध्वनिक्षेपकाच्या सहाय्याने बगाडाला बैल जुंपणे, बैल बदलणे, तसेच आवश्यक सूचना करणे आदी आवश्यक नियोजन केले जात असल्याने बगाड रथ नियोजनात सुसूत्रता येत होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये
यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत राजेंद्र कचरे यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे आदींच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त या ठिकाणी नेमण्यात आला होता.

सातारा जिल्हा परिषद व जिल्हा रुग्णालयाचे
वैद्यकीय पथक याठिकाणी दाखल करण्यात आले होते. पशूवैद्यकीय अधिकाऱ्यांनी देखील तत्पर सेवा दिली. वाई सातारा रस्त्यावर विविध खाद्य पदार्थ, खेळण्यांची दुकाने लागली आहेत. काशीनाथाचे चांगभलं च्या गजरात यात्रेत किरकोळ दुखापत वगळता
यात्रा सुरळीत पार पडली.

Next Post
५०० झाडांसोबत इंदापूरच्या वृक्ष संजिवनी परिवाराची पर्यावरणपूरक अनोखी रंगपंचमी!

५०० झाडांसोबत इंदापूरच्या वृक्ष संजिवनी परिवाराची पर्यावरणपूरक अनोखी रंगपंचमी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group