• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

२२ हजार होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा! सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांची एमएमसीमध्ये स्वतंत्र नोंद घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश!

tdadmin by tdadmin
February 27, 2025
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, कोकण, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, रोजगार, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, व्यक्ती विशेष, Featured
0
२२ हजार होमिओपॅथी डॉक्टरांना मोठा दिलासा! सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांची एमएमसीमध्ये स्वतंत्र नोंद घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश!

मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याने त्याचा २२ हजार डॉक्टरांना होणार थेट फायदा!

डॉ. संदेश शहा, इंदापूर

सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांची एमएमसी मध्ये स्वतंत्र नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री, नामदार हसन मुश्रीफ यांनी २५ फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालयात दिल्याने त्याचा थेट फायदा सीसीएमपी उत्तीर्ण २२ हजार होमिओपॅथिक डॉक्टरांना होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे होमिओपॅथिक डॉक्टरांनी जोरदार स्वागत केले आहे.

सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांची एमएमसी मध्ये स्वतंत्र नोंद घ्यावी, कौन्सिल सदस्य संख्या वाढविणे तसेच अधिनियमातील इतर दुरुस्त्यासंबंधी महाराष्ट्र होमिओपॅथी सल्लागार समितीने केलेल्या शिफारसीनुसार महाराष्ट्र होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ऍक्ट मधे दुरुस्त्या करणे या व होमिओपॅथीच्या इतर प्रलंबित विषयावर दिनांक २५ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात बैठक झाली.

या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे मुख्य विधिमंडळ प्रतोद आमदार रणजीत सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉक्टर सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, महाराष्ट्र शासनाच्या होमिओपॅथी सल्लागार समितीच्या अध्यक्ष डॉ. रजनीताई इंदुलकर, सदस्य डॉ. नितीन गावडे, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ. बाहुबली शहा, समिती सदस्य डॉ. सुधीर म्हात्रे, अकोला जिल्हा होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण अग्रवाल, सचिव डॉ. प्रशांत सांगळे, इतर सदस्य तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, प्रधान सचिव श्री धीरजकुमार, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन डॉ.अजय चंदनवाले, अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर, महाराष्ट्राचे मुख्य औषध नियंत्रक डी. आर. गहाणेसाहेब,अन्न व औषध प्रशासन उपायुक्त डॉ. संतोष काळे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य उपसचिव डॉ. तुषार पवार, कार्यसन अधिकारी अनिल चौरे, एमएमसी प्रबंधक डॉ. वाघमारे आदी उपस्थित होते.

बैठकीत डॉ. बाहुबली शहा यांनी सीसीएमपी कोर्स बाबतच्या सर्व कायदेशीर व तांत्रिक बाजूंचा ऊहापोह करून एमएमसी कोणतेही कारण नसताना अडवणुकीचे धोरण अवलंबून एक प्रकारे सरकार व विधीमंडळाला आव्हान देत असल्याचे मत मांडले. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी एमएमसी प्रबंधकांना विचारले असता त्यांनी कायद्यातील तरतुदी व परिशिष्टात क्रमांक २८ ला सीसीएमपी अर्हतेची नोंद असल्याचे कबूल केले पण कोर्ट केस ७८४७/२०१४ अनिर्णित असल्याने आम्ही नोंद करून घेत नाही असे सांगितले.

त्यावर डॉ. बाहुबली शहा यांनी आक्षेप घेत यासंदर्भात कोणत्याही न्यायालयाचा स्थगिती आदेश नसल्याचे सांगितले. तसेच कायदा विधिमंडळाने पारित केल्यानंतर व राज्यपालांनी तो राज्यात लागू केल्यानंतर जोवर कोणतेही न्यायालय असंवैधानिक ठरवून कायदा किंवा त्यातील विशिष्ट तरतुदी रद्द करत नाही किंवा त्याला स्थगिती देत नाही तोवर त्या कायद्याची अंमलबजावणी कुठली ही यंत्रणा रोखू शकत नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले.

त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी न्यायालयीन स्थगितीचा आदेश आहे का? असे विचारले असता, एम एम सी प्रबंधकांनी असा कोणताही आदेश नसल्याचे मान्य केले व विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागवण्याचे सुतोवाच केले. त्यावर देखील डॉ. बाहुबली शहा यांनी पुन्हा आक्षेप घेऊन ही कालहरण करण्याची क्लृप्ती असल्याचे सांगितले. या क्षणी आमदार रणजीत सावरकर यांनी आक्रमकपणे हस्तक्षेप करून विधेयकावेळी विधी व न्याय विभागाने जे काही मत द्यायचे, ते दिले असून नंतर मंत्री मंडळ, विधिमंडळ व राज्यपाल यांच्या संमतीने कायदा अस्तित्वात आला आहे. आता विधी व न्याय विभागाचा यात काहीही संबंध येत नाही असे स्पष्ट सांगितले.

त्यानंतर मात्र मंत्री महोदयांनी ताबडतोब ऍक्शन घ्या असे निर्देश एमएमसी प्रबंधक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य प्रशासनास दिले. यावेळी इतर प्रश्नावर देखील साधक बाधक चर्चा होऊन ते कालबद्ध पद्धतीने निकाली काढण्याचे निर्देश मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रणजीत सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे डॉ. बाळासाहेब पवार, होमिओपॅथी सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. रजनी इंदुलकर,आयुक्त राजीव निवतकर, प्रधान सचिव धीरज कुमार,उपसचिव पवार साहेब, संचालक आयुष वैद्य रमण घुंगराळेकर, उपसंचालक होमिओपॅथी डॉ. स्वानंद सोनार यांचे या बैठकीत वस्तुनिष्ठ व सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल डॉ . बाहुबली शहा यांनी धन्यवाद दिले.

Next Post
चला रे.. आता ग्रामपंचायत नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीला लागायचंय!

मुख्यमंत्र्याच्या गुडबुक मधून 23 हजारपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना डच्चू..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group