डॉ. संदेश शहा, इंदापूर
दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान सरहद पुणे या संस्थेला मिळाला. हे संमेलन २१ व २२ व २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधी मध्ये पार पडले.
या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कविकट्टा या काव्यमंचासाठी कविता निवड समितीतर्फे इंदापूर येथील लेखिका, कवयित्री पौर्णिमा सावंत यांनी पाठविलेल्या ‘शिवसुर्य’ या कवितेची निवड करून त्यांना संमेलनासाठी निमंत्रित केले होते. त्यांना २२ फेब्रुवारी रोजी कविता सादर करण्याची संधी मिळाली. सदर कविता सादर करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले सभामंडप व शाहीर अमर शेख व्यासपीठ खुले करून देण्यात आले होते.
येथील साहित्य संमेलनात देशभरातून अनेक उत्साही रसिक प्रेक्षक उपस्थित होते. अनेकांनी ‘शिवसूर्य ‘कवितेचे कौतुक केले. यानिमित्त साहित्य संमेलन समितीने सौ. पौर्णिमा सावंत यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. या काव्यमंचावर अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व सदस्य राजन लाखे उपस्थित होते.
पौर्णिमा सावंत या इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील शाळेतील शिक्षक विठ्ठल सावंत यांच्या पत्नी असून इंदापूर महाविद्यालयातील इतिहासाचे सेवानिवृत्त प्राध्यापक विजय रणपिसे यांच्या कन्या आहेत. पौर्णिमा सावंत या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. कवी दिनेश आदलिंग व रामदास देवकर यांनी कवयित्री पौर्णिमा सावंत यांचे अभिनंदन केले आहे.











