• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये विद्याटेक 2025 राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा

tdadmin by tdadmin
February 27, 2025
in यशोगाथा, सामाजिक, शिक्षण, आरोग्य, आर्थिक, कथा, राष्ट्रीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये विद्याटेक 2025 राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा


बारामती : महान्यूज लाईव्ह

येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे बीबीए(सीए) या विभागामार्फत राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालय विविध स्पर्धा VidyaTech २०२५ चे २१ फेब्रूवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे, नगर, सोलापूर सातारा इ. या जिल्ह्यामधून विविध महाविद्यालयातील बी. बी. ए. (सी. ए.), बी. सी. ए. (सायन्स ) आणि बी. एस. सी.(कॉम्पुटर सायन्स),बी कॉम (आय.टी.) विभागाच्या 339 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपल्या विविध कौशल्यांचे सादरीकरण केले. यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोग्रामिंग वॉर, प्रोजेक्ट प्रेसेंटेशन आणि प्रश्नमंजुषा फेरी अश्या स्पर्धांचे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी प्रा.सचिन महाजन, पद्मश्री विखे पाटील ए.एस.सी कॉलेज, प्रवरानगर, प्रा. भास्कर रासकर, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण, प्रा. विठ्ठल रूपनवर, मुधोजी कॉलेज, फलटण, प्रा. स्वप्नील जाधवराव व प्रा. मेघा काळे, वाघिरे महाविद्यालय सासवड व प्रा. प्रियांका वाघोले, एकनाथ दिवेकर ए.एस.सी कॉलेज, वरवंड हे या स्पर्धेला परीक्षक होते.

या स्पर्धेत पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये पाटणच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या नमीरा सावर्डेकर हिने प्रथम क्रमांक, तर फलटणच्या मुधोजी महाविद्यालयातील मोहिनी बोराटे हिने द्वितीय क्रमांक, बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रतीक्षा चोरमले व मयुरी वाळूंज यांना तृतीय क्रमांक मिळाला तर प्रोजेक्ट प्रेझेंटेशनमध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या ऋतुजा संतोष डोंगरे व अनुष्का संतोष चोरगे यांना प्रथम क्रमांक, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या रोहन अशोक आटोळे याने द्वितीय तर बारामती विद्या प्रतिष्ठानच्या ओमकार पवार व प्रणव ताकवणे  यांना तृतीय क्रमांक मिळाला.

प्रोग्रामिंग वॉरमध्ये बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या रोहन देयचौधरी याने प्रथम, जठार सुजल याने द्वितीय तर उदय सूर्यवंशी याने तृतीय क्रमांक मिळवला. प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे पायल शत्रुघ्न शितोळे प्रथम क्रमांक, करुणा काळूराम रंधवे द्वितीय तर श्रेया जगताप हिने तृतीय क्रमांक मिळवला.

बक्षीस वितरण कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉ.विलास कर्डिले, प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब काशीद, उपप्राचार्य डॉ. घाडगे, विभाग प्रमुख महेश पवार. नीलिमा पेंढारकर, आय. क्यू. ए. सी. समन्वयक, गजानन जोशी, किशोर ढाणे आदी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे  एम आयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी आपल मन, मस्तक आणि मनगट तयार करायला हव याचा भविष्यातील असणाऱ्या करिअर संधी मिळवण्यासाठी उपयोग होईल अशी माहिती दिली व वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन जिंकलो/ हरलोपेक्षा इतर कौशल्यांचाही विकास करण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.भरत शिंदे यांनी स्पर्धेचे, स्पर्धकांचे आणि आयोजक बी.बी. ए.(सीए) विभागाचे कौतुक केले. सर्व स्पर्धकानी आपल्या सहभागामधील आनंद शोधला पाहिजे आणि तो आनंद आपल्या शैक्षणिक वाटचालीत कायम ठेवला पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रा.विशाल शिंदे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात विभागामार्फत होणाऱ्या वेगवेगळ्या विद्यार्थी पूरक उपक्रमाची माहिती दिली.

या स्पर्धेला विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव ॲड. निलिमा गुजर, डॉ. राजीव शाह, किरण गुजर, मंदार चिकाची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे व उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे व उपप्राचार्य लालासो काशीद यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन पूनम गुंजवटे यांनी केले, परिचय प्रा. अनिल काळोखे यांनी तर आभार प्रा. अक्षय भोसले यांनी मानले. स्पर्धेचे नियोजन करण्यात प्रा.अक्षय भोसले, प्रा. वैशाली पेंढारकर, प्रा. कांचन खीरे,प्रा. अक्षय शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजन केले.

Next Post
दिल्ली गाजवली इंदापूरच्या  पौर्णिमेच्या शिवसूर्याने…!

दिल्ली गाजवली इंदापूरच्या  पौर्णिमेच्या शिवसूर्याने...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group