पुणे : महान्यूज लाईव्ह
चार महिन्यापूर्वी ग्रामीण भागात ड्रोन हैदोस घालत होते. अनेकदा रात्रीच्या वेळी हेड्रोल वाड्यावर देखील फिरू लागले त्यानंतर ते शहरात देखील फिरू लागले आणि चोरीच्या अफवा सुरू झाल्या अनेक ठिकाणी चोरीच्या अफेवरून लोकांना मारहाण देखील झाले या सगळ्या पार्श्वभूमीवर सातत्याने पोलीस या अफवा आहेत असे सांगत राहिले मात्र ड्रोन मात्र फिरत होते आता पुणे पोलिसांनी यावर मोठा तोडगा काढला आहे.
या पुढील काळात रात्री बे रात्री किंवा विनापरवानगी ड्रोन उडाला आणि पोलिसांना याची माहिती मिळाली तर तो ड्रोन ड्रोन चालकाच्या मर्जीने नव्हे, तर पोलिसांच्या मर्जीने खाली उतरेल, तोही एका क्षणात! पुणे ग्रामीण पोलिसांनी ड्रोनचे गैरप्रकार रोखण्यासाठी एक प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामध्ये परवानगी नसताना अवैध प्रकारे ड्रोन जर कुठे उडवला आणि त्याची माहिती पोलिसांना कळाली तर पोलिसांच्या ड्रोन विरोधी पथकाकडून तातडीने कारवाई होईल.
काय असेल कारवाई? अशा ड्रोनला जागीच थांबवून खाली उतरविण्याची प्रणाली पोलिसांनी कार्यान्वित केली आहे. निवडक पोलिस अधिकाऱ्यांना या प्रणालीसंबंधी प्रशिक्षण देण्यात आले असून, कुठेही असे अवैध ड्रोन आढळून आल्यास दुरूनच ते नियंत्रित व स्थगित करण्याची क्षमता या रिमोट प्रणालीमध्ये आहे. अवघ्या काही मिनिटांत संबंधित ड्रोन खाली घेतले जाते व त्याच्या चालकाचा माग काढता येतो.
या आधुनिक प्रणालीची पाहणी नुकतीच उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी केली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पाषाण येथील मुख्यालयात अजित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी आवर्जून या ड्रोनविरोधी प्रणालीचे प्रात्यक्षिक पाहिले व त्याच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, ड्रोनविरोधी पथकाचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक संतोष साळुंखे, सहायक पोलिस उपनिरीक्षक तथा अंमलदार संदीप लालासो जगताप, नागेश मडीवाल यांनी पवार यांना ड्रोन रोखण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
बारामतीच्या पणदरे गावचे सुपुत्र असलेले राज्य राखीव पोलिस दलाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संदीप जगताप यांनी रिमोट मशीन ऑपरेट करून हवेत उडणारे ड्रोन थांबवून जागीच खाली कसे घेता येते हे पवार यांना प्रत्यक्षात दाखवले. त्यावेळी “हे आपल्या ग्रामीण भागातील गैरप्रकार थांबविण्यासाठी उपयुक्त ठरेल” अशी पुष्टी देत पवार यांनी प्रशंसा केली.











