• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ग्रासलॅन्ड सफारी’ तून पुणे वन विभागाला ३४ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा महसूल! त्यात इंदापूरच्या कडबनवाडीचे ७५ टक्के योगदान! उलगडली गवतामधील जैवविविधता !

tdadmin by tdadmin
January 12, 2025
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पर्यावरण, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
ग्रासलॅन्ड सफारी’ तून पुणे वन विभागाला ३४ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा महसूल! त्यात इंदापूरच्या कडबनवाडीचे ७५ टक्के योगदान! उलगडली गवतामधील जैवविविधता !

डॉ. संदेश शहा, इंदापूर

पुणेकरांना गवताळ प्रदेशाची जैवविविधता समजावी, तेथील वन्यजीव पाहता यावेत या हेतूने पुणे वन विभागाने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या ‘ग्रासलॅन्ड सफारी’ या पथदर्शी अभियानास वन्यप्रेमी नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून ३ हजार ४४ हून जास्त वनसफर झाल्या. यातून वनविभागास एकूण ३४ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यात इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीचे ७५ टक्के योगदान आहे.

माळरानावर वेगळ्या प्रकारचे पक्षी, प्राणी व इतर वन्यजीव राहतात. येथील जैवविविधतेचा अभ्यास करता यावा, यासाठी राज्यात प्रथमच वन सफारीचा पथदर्शी प्रयाेग पुणे जिल्ह्यात राबविण्यात आला. या सफारीत कोल्हा, चिंकारा, लांडगा, ससे, खोकड, तरस आदी प्राणी वन्य प्रेमींना पाहायला मिळाले. माळरान म्हणजेच गवताळ कुरण असून या परिसंस्थेत कोल्हा, चिंकारा, लांडगा, ससे, खोकड, तरस आदी प्राण्यांचा अधिवास असून, तो सध्या धोक्यात आला आहे. ताे वाचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरलाआहे.

आता माळरान म्हटलं की, लोकांना ते पडीक रान वाटते. परंतु, या परिसंस्थेत खूप जैवविविधता असते. त्याची ओळख व्हावी म्हणूनच हा उपक्रम तत्कालीन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या पुढाकाराने राबविला जात आहे. यासाठी ‘द ग्रासलँड्स ट्रस्ट’च्या वतीने त्यांना हा प्रस्ताव देण्यात आला होता.

पुण्यातील बारामती आणि इंदापूर तसेच सोलापूर जिल्ह्यातील काही भागात असलेल्या गवताळ प्रदेशातील सफारी सुरू करून आता एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात हजारो पर्यटकांनी या सफारीचा आनंद लुटला. गेल्या वर्ष भरात वनविभाग, निमगाव केतकी येथील फ्रेंडस ऑफ नेचर क्लब, कडबनवाडीचे माजी सरपंच भजनदास पवार, तानाजी धोत्रे तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या पाठिंब्यामुळे गवताळ प्रदेशातील जैवविविधते बाबत जनजागृती देखील होत आहे.

इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी व बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे सुरू करण्यात आलेल्या सफारीने पर्यटकांना गवताळ प्रदेशातील वन्यजीवांचे सुखावह दर्शन होत आहे. या गवताळ प्रदेशात प्रामुख्याने लांडगे, चिंकारा, कोल्हे, गवताळ प्रदेशातील पक्षी आणि सरपटणारे प्राणी आहेत, ज्यामुळे ते निसर्ग प्रेमी आणि वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. वर्षभरात वनविभागाने तब्बल ३ हजार ४४ सफारीचे आयोजन केले.

या सफारींमुळे स्थानिक ३० कुटुंबाना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला. या सफारीतून कडबनवाडी आणि शिर्सुफळ येथील गाईडने १५ लाख २२ हजार रुपयांची कमाई केली, तर वन विभागाने अतिरिक्त १९ लाख ५५ हजार ३०० रुपयांचे उत्पन्न मिळवले. या सफारीमुळे वन विभागास एकूण ३४ लाख ७७ हजार ३०० रुपयांचा महसूल मिळाला. यात एकट्या कडबनवाडीने उत्पन्नात ७५ टक्के योगदान दिले आहे.

मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण म्हणाले, गवताळ प्रदेशातील जीवसृष्टी मध्ये खूप वैविध्य असते. ती पडीक जमीन नसते, याची माहिती व्हावे, त्याचे संवर्धन व्हावे म्हणून हा उपक्रम स्तुत्य ठरला. सफारीमुळे स्थानिक नागरिकांच्या रोजगाराच्या व उत्पन्न वाढीसाठी फायदा झाला. गेल्या वर्षभरात इको टूरिझमला देखील वाव मिळाला.

पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते म्हणाले, “हा उपक्रम वन विभागाच्या गवताळ प्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी राबवला. हा वन विभागाचा एक मैलाचा दगड ठरत आहे. आमच्या टीमचे समर्पण आणि स्थानिक लोकांचा सहभाग यामुळे हा प्रकल्प चांगलाच लोकप्रिय होत आहे.

फ्रेंडस ऑफ नेचर क्लब चे संस्थापक विधीज्ञ सचिन राऊत म्हणाले, चिंकारा हरीण हे ६० ते ६५ सेंटीमीटर उंच असून त्यांचे वजन २० ते २५ किलो असते. या चिंकारा हरिणामुळे कळस परिसरात हरणेश्र्वर मंदिर निर्मिती झाली आहे. चिंकारास वन्य प्राणी संरक्षण कायदा लागू आहे. गेली २२ वर्षापासून क्लबचे सुरेशचंद्र वारघडे, भजनदास पवार, विधीज्ञ श्रीकांत करे, मनोहर चांदणे, जावेद मुलाणी, राहुल लोणकर, वैभव जाधव यांच्यासह सर्व सदस्य चिंकारा हरिण अधिवास, संवर्धन यासाठी निरपेक्ष भावनेने योगदान देत आहे. त्यास आता चांगले स्वरूप प्राप्त झाले आहे.

कडबनवाडी परिसरात चिंकारा हरणांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाय योजना करणे, त्यांची जनगणना करणे, वनखात्याचे कर्मचारी यांचा अनुशेष भरून काढणे, कर्मचाऱ्यांना स्व – संरक्षणासाठी परवानाधारक शस्त्रे देणे, चिंकारा हरणांना पिण्याच्या पाण्याची पाणवठ्यावर शाश्वत सोय करणे, वनाभोवती संरक्षक कुंपण उभा करणे आदी बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र शासन वनविभागाच्या माध्यमातून कडबनवाडी येथे चिंकारा संरक्षण आणि जैव विविधता उद्यान याची मुहूर्तमेढ खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते एक वर्षापूर्वी रोवली होती. त्याचे चांगले फळ मिळत आहे तर भजनदास पवार यांनी येथे २० एकर जागेत ऑक्सिजन पार्क ची निर्मिती करून त्यामध्ये वड, पिंपळ, लिंब आदी डेरेदार झाडांचे संवर्धन केले आहे. त्याचा देखील फायदा हरिण संवर्धनासाठी होत आहे. त्यामुळे हे पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले असून उत्तरोत्तर पर्यटकांची संख्या वाढत आहे. येथील चिंकारा, भादलवाडी येथील चित्र बलाक, कुंभारगाव पळसदेव येथील रोहित सह इतर २५० हून जास्त प्रकारांचे पक्षी निरीक्षण व त्यांचा अधिवास अभ्यास हे वन्यप्रेमींसाठी पर्वणी ठरत आहे. त्यामुळे वन्यप्रेमींसाठी येथे आवास निवास भोजन सुविधेसह सुसज्ज शासकीय टुरिझम केंद्र सुरू करणे ही काळाची गरज आहे.

Next Post
बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा! खोटी तक्रार देऊन खंडणी मागितली. या प्रकरणी ग्राहक संरक्षण समितीचा सदस्य प्रमोद जाधव याच्याविरोधात माळेगाव मध्ये गुन्हा दाखल!

कामाला जायचं म्हणून ट्रॅक्टर दिसल्यावर हात केला.. ही लिफ्ट त्याला महागात पडली; ट्रॅक्टरवरून पडला आणि मृत्यू झाला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group