नातेपुते : महान्यूज लाईव्ह
माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या मतदानाच्या मुद्द्यावरून चर्चेत आले आहे. महाविकास आघाडी कडून याच गावातून बॅलेट पेपर वरील मतदान घेण्यासाठीची आंदोलनाची तयारी सुरू आहे तर दुसरीकडे हे आंदोलन चिरडण्यासाठी भाजपने आता त्यांचे काही नेते या गावात पाठवायला सुरुवात केली आहे.. त्याची सुरुवात गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून झाली त्यावेळी गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केले.
शंभर शकुनी मेल्यानंतर शरद पवार जन्माला आले अशा स्वरूपाची जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली, धनगर समाज लोकशाही मानत नाही हे दाखवण्यासाठी शरद पवारांनी मारकडवाडी ची निवड केली असल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला. तर सदाभाऊ खोत यांनी खळं लुटायला गावाकडे आला अशा स्वरूपात टीका केली. या टीकेचे राज्यभर प्रसाद उमटत आहेत. भाजपचे नेते पडद्याअडून या दोघांना प्रोत्साहन देत आहेत अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली.
या टीकेल आज आमदार उत्तमराव जानकर यांनी प्रत्युत्तर देताना असली बारकी चिरकी उंदरं पवार साहेब रोज नाश्त्याला खात्यात अशी टीका केली. त्यांच्यामागे कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे. बारक्या उंदरांच्या सुळसुळाटाने काय फरक पडत नाही. कावळ्याच्या शापाने गुरं मरत नसतात. पवारसाहेब हे पवारसाहेब आहेत. त्यांनी भल्याभल्यांना लोळवलं आहे. जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही, तोपर्यंत मारकडवाडीमधील आंदोलन सुरूच राहील असे प्रत्युत्तर जानकर यांनी दिले.











