मुंबई : महान्यूज लाईव्ह
बजरंग दलाने केलेल्या विरोधानंतर बारामतीत ज्या मिरवणुकीला पोलिसांनी बंदी घातली, त्या सदर्भात संविधान दिन, हजरत टिपू सुलतान स्मृती दिन व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मृतिदिनानिमित्त बारामतीत मोर्चा काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) च्या वतीने उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे व न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने या संदर्भात सरकारचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी 12 डिसेंबर ही पुढील तारीख सुनावणीसाठी दिली आहे.
संविधान दिन, हजरत टिपू सुलतान स्मृतिदिन व भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद दिनानिमित्त हा मोर्चा बारामतीत काढण्यात येणार होता. तो नोव्हेंबर मध्येच काढण्यात येणार होता, मात्र बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधामुळे पोलिसांनी परवानगी नाकारली त्यामुळे फैयाज शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात शेख यांचे वकील तपन थत्ते यांनी या याचिकेवर युक्तिवाद केला.











