दौंड, महान्यूज लाईव्ह
भारत सरकारच्या जागतिक संस्कृती आणि पर्यावरण संरक्षण आयोगामार्फत कांदा व ऊस शेतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य श्रीमती रिचीन ल्हामा यांच्या हस्ते डॉक्टरेट देऊन नुकताच सन्मानीत करण्यात आले.
दौंड तालुक्यातील पाटस येथील संदीप विश्राम घोले यांना भारत सरकारच्या वतीने डॉक्टरेट प्रदान करुन गौरव करण्यात आला आहे. दौंड तालुक्यात प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी म्हणून संदीप घोले यांची ओळख आहे. ते संपूर्ण भारतभर शुद्ध कांदा बियाण्याची निर्मिती कशी करावी याबाबत ठिकठिकाणी शिबीरे घेत आहेत, तसेच संदीप प्याज या वाणाची निर्मिती, सोशल मीडिया वरून मार्गदर्शन शेती सदर्भात माहिती देण्याचे काम केले आहे.
कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेण्यासाठी तसेच नवनवीन बी बियाण्यांचे संशोधन त्यांनी केले आहे. त्याबाबत त्यांना भारत सरकारच्या जागतिक संस्कृती आणि पर्यावरण संरक्षण आयोगामार्फत कांदा व ऊस शेती मध्ये क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल केंद्र सरकारच्या अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य श्रीमती रिचीन ल्हामा यांच्या हस्ते डॉक्टरेट देऊन नुकताच सन्मानीत करण्यात आले.











