पुणे : महान्यूज लाईव्ह
किती विकृती समोर येते.. घटना पुण्यातील सहकार नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. एका पंधरा वर्षीय मुलाला अनैसर्गिक कृत्य करायला लावून त्याचे फोटो काढून विविध मोबाईलवरून फोन केले आणि मानसिक त्रास दिला त्यामुळे पंधरा वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
या धक्कादायक घटनेनंतर सहकारनगर पोलिसांनी पोक्सो कायद्याखाली व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मुलाच्या वडिलांनी यासंदर्भात पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी संकेत राजेश मोहिले (वय २६, रा. भवानी पेठ व धनकवडी) यास अटक केली.
तळजाई टेकडी चा परिसरात नोव्हेंबर 2023 ते 25 नोव्हेंबर 2024 या एका वर्षात हा प्रकार वेळोवेळी घडला. हा पंधरा वर्षाचा मुलगा दहावी मध्ये शिक्षण घेत होता. संकेत मोहिले हा त्याला तळजाई येथील टेकडीवर घेऊन गेला आणि त्याने मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. एवढेच नाही, तर त्याचे फोटो देखील काढले. त्यानंतर हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेगवेगळ्या फोनवरून हे फोटो आम्हाला आले आहेत, असे सांगत तो त्रास देत होता. त्यामुळे हा मुलगा खचून गेला आणि त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.











