सुरज चव्हाणसाठी आता राजकीय नेते ही सरसावले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्ट करत सुरज चव्हाण ला वोटिंग करण्यासाठी आवाहन केलं आहे. सुरज चव्हाण बिग बॉस मध्ये गेल्यापासून राज्यभरात त्याची क्रेझही निर्माण झाली आहे व त्याची चर्चा सुरू आहे.
आज युगेंद्र पवार यांनी फेसबुक पोस्ट करत, आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावचा सुपुत्र, प्रसिद्ध रिल्सस्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय. देशभर त्यांची क्रेझ वाढली आहे. बिग बॉस सारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये २७४ लोकांमधून अंतिम १६ मध्ये त्याची निवड झाली, हि आपल्या बारामतीसह अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान युगेंद्र पवार यांनी असे बारामती तालुक्यातील दर्शकांना आवाहन केले आहे की, आपल्या अतिशय व्यस्त दिनक्रमातून केवळ दोन मिनिटांचा वेळ काढून आपल्या लाडक्या सुरज चव्हाण यास वोट करून महाविजेता करण्यासाठी आपले योगदान देऊयात. त्यासाठी जिओ सिनेमा अप्लिकेशन इंस्टॉल करुन Big Boss Marathi या टॅबवर जाऊन Vote Now वर गेल्यावर सूरजच्या फोटोवर टच करुन आपलं वोट सबमिट करा अशी विनंती ही त्यांनी केली आहे.











