विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बाबुर्डी (ता. बारामती) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे गावभेट दौऱ्यानिमित्त आले होते. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाबुर्डी गावाने सुनेत्रा पवार यांना लीड देऊन अजित पवारांवर विकासाचा वादा म्हणत त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. गावातील महीला भगिनींनी राख्या बांधत लाडकी बहिण योजनेचे स्वागत व आभार मानले. मग योजनेच्या जलपूजनासाठी जय पवार निघाले, तेव्हा रस्त्यातील चिखलामुळे गाड्या जाणार नाहीत असे लक्षात येताच थेट स्वतःच ट्रॅक्टर चालवला.
बाबुर्डीत आल्यानंतर गावकऱ्यांशी संवाद साधताना जय पवार यांना गावकऱ्यांनी विधानसभेला दादांशिवाय पर्याय नसून आज येणारे विरोधक निवडणूक झाल्यावर परत येणार नाहीत, त्यामुळे लोकसभेपेक्षाही विधानसभेला चांगले काम करु असा निर्धार व्यक्त केला. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर जनाई उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून खोरेमळा येथे सोडण्यात आलेल्या पाण्याचे जलपूजन करायचे होते.
कच्च्या रस्त्याने चिखल असल्यामुळे व पाऊस झाल्यामुळे अखेर दुचाकी जाणार नाहीत हे लक्षात येताच जय पवार यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत कार्यकर्ते आणि बालचमूला सोबत घेऊन जलपूजनस्थळी गेले. अजित पवार त्यांच्या धडाकेबाज कामामुळे अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहेत, अन् वर्षानुवर्षे त्यांची जनतेशी असलेली नाळ घट्ट आहे, तशाच पद्धतीने जय पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत ट्रॅक्टर चालवत जलपूजन करण्यासाठी येतात. हेच अनेकांना अप्रूप वाटले.
यावेळी शेतकरी संजय खोरे या शेतकऱ्याने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमांतून या ठिकाणी असलेल्या ओढ्यावर सुमारे एक कोटी रुपये खर्च करून चार बंधारे आणि वीस लाख रुपये निधीतून ओढा खोलीकरण करण्यात आल्याने पाणी पातळी वाढली आणि शेतकऱ्यांना याचा फायदा झाला.
यावेळी सरपंच दत्तात्रय ढोपरे, निलेश लडकत, बाळासाहेब पोमणे, संतोष पोमणे, नानासाहेब लडकत, हौसेराव पोमणे, जयराम बाराते, दत्तात्रय लव्हे, शांताराम ढोपरे, राजकुमार लव्हे, लक्ष्मण पोमणे, माऊली पोमणे, अंकुश लडकत, गोविंद बाचकर, दिलीप पोमणे, भानुदास पोमणे, प्रकाश लोणकर, गोरख खोमणे, दत्तात्रय लडकत, अनिल पोमणे, गोरख ढोपरे, रघुनाथ पोमणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.











