विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र युवा नेते जय पवार यांनी दुचाकीवरून बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा केला.
बारामती तालुक्यातील माळेगाव, खामगळवाडी, पणदरे, वाघळवाडी आणि सोमेश्वर कारखाना परिसरात कार्यकर्त्यांच्या, नागरिकांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. पणदरे येथे वृक्षारोपणही जय पवार यांनी केले. वाघळवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन लाडकी बहिण योजनेविषयी माहिती घेत महिलांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या.
जय पवार यांनी केलेल्या दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेऊन संवाद साधला व नागरिकांशी ही चर्चा करून अडी-अडचणी जाणून घेतल्या. जय पवार यांच्या दौऱ्यामुळे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.











