दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड : आजचा रविवार दौंड तालुक्यातील मळद येथील त्या दाम्पत्यासाठी घातवार ठरला. वेळ सकाळी दहाची.. दौंड तालुक्यातील मळद येथील दाम्पत्य रस्ता ओलांडत असताना पुणे सोलापूर महामार्गावर एका लक्झरी बसने त्यांना उडवलं.
मळद येथील दत्तात्रय गंगाधर यादव आणि त्यांच्या पत्नी सुमन यादव यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी सकाळी दहा वाजता ही घटना घडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील मळद येथे हा अपघात घडला.
मळद येथील घागरे वस्ती येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. दत्तात्रय यादव व त्यांच्या पत्नी दुचाकीवरून रस्त्याचा दुभाजक ओलांडत होते. त्याचवेळी अत्यंत वेगाने लक्झरी बस पाठीमागून आली. यादव दांपत्याला ही ती बस लगेच दिसली नाही आणि बसला ही आवरता आले नाही. त्यामुळे पाठीमागून जोरदार धडक बसल्याने यादव दांपत्य हवेत उडाले. घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.











