• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंड मध्ये यंदा ओबीसी पर्व? शरद पवारांचा पक्ष करतोय ओबीसी उमेदवाराची चाचपणी?

tdadmin by tdadmin
July 24, 2024
in यशोगाथा, सामाजिक, आरोग्य, आर्थिक, कामगार जगत, राष्ट्रीय, राजकीय, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
दौंड मध्ये यंदा ओबीसी पर्व? शरद पवारांचा पक्ष करतोय ओबीसी उमेदवाराची चाचपणी?

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

दौंडला आमदारकीचे अनेकांना लागलेत डोहाळे! पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून ओबीसी उमेदवाराची केली जाते चाचपणी !

राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह

दौंड : लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीने विधानसभेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर दौंड मध्ये आगामी विधानसभेची काहींनी जोरदार तयारी केली असून आपणच दौंडचा भावी आमदार असे स्वप्न ते पाहू लागले आहेत.

काहींना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत असे म्हटलं तरी ते वावगे ठरणार नाही. अर्थात मागील पंचवीस – तीस वर्षापासून दौंडवर कुल घराण्याचे निर्वाद वर्चस्व आहे‌. दौंडचं राजकारण आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या भोवतीच फिरत राहिल्याचे आत्तापर्यंतच राजकीय चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही दोघांचीच आलटून पालटून सत्ता राहीली आहे.

एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या कुल- थोरात यांना लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच व्यासपीठावर आणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता महायुतीतील एक प्रमुख नेते म्हणून गणले जात आहेत. त्यामुळे दौंडच्या संदर्भात अजित पवारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सध्या तरी आजी-माजी आमदारांना अजित पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून राहावे लागणार आहे.

तरीही आमदार राहुल कुल यांनी आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून विकासकामांचा शुभारंभ आणि उद्घाटनाचे कार्यक्रम मोठ्या थाटामाटात केले. आमदार कुल हे पुन्हा तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी विधानसभेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार रमेश थोरात यांची मात्र गोची झाली आहे. पक्ष फाटाफूट झाल्यानंतर आता थोरात अथवा त्यांच्यासमवेत पक्षातून अजित पवारांच्या गटात गेलेल्या कोणालाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात घेण्यास थेट नकार दिल्याची चर्चा दौंड तालुक्यात सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सध्या काहीजण आताच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत दौंडमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या पुढे पुढे करीत आहेत. आपल्यालाच उमेदवारी मिळणार या भ्रमात ते सध्या भावी आमदार म्हणून वावरत आहेत. काहींना तर गावात कोणी विचारत नाही, अशांना दिवसाढवळ्या आमदारकीचे स्वप्न पडत आहेत.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांकडून उमेदवारी घेण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत‌. लोकसभेच्या विजयानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार आणि भाजपला रामराम ठोकून लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी त प्रवेश केलेले नामदेव ताकवणे असे दोन गट सध्या तालुक्यात आपल्या राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करीत आहेत. तर मराठा ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नव्याने उदयास आलेला ओबीसी बहुजन पार्टी हा पक्ष लोकसभेच्या दारुण पराभवानंतर गारठला आहे.

विधानसभेसाठी ओबीसी बहुजन पार्टीने सध्या तरी तयारी केली नसून ते विधानसभेसाठी प्रबळ उमेदवार देतील अशी शक्यता नाही. दौंड विधानसभेसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसी उमेदवार द्यावा अशी दोन्ही पक्षातील ओबीसींकडून मागणी होत आहे. तशी चाचपणी ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे दौंड मधून ओबीसी उमेदवार देण्यासाठी चाचपणी करीत असून ऐनवेळी ते दौंड मध्ये मोठा राजकीय धक्का देणार असल्याची चर्चा आहे.

दौंडला आमदार कुल आणि माजी आमदार थोरात यांना जनता वैतागली आहे. आमदार कुल आणि थोरात यांचे एका व्यासपीठावर एकत्र येणे, एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा करणे, हे दोन्ही गटातील अनेक कार्यकर्त्यांना खटकले आहे‌. या दोघांसाठी गावागावात अनेक कार्यकर्ते एकमेकांचे शत्रु बनले आहेत. अनेकांवर या दोघांच्या गटातटांच्या राजकरणामुळे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे असे कार्यकर्ते या दोघांनाही वैतागले आहेत. दौंडच्या सर्वसामान्य जनतेला मात्र आगामी विधानसभेसाठी नवा चेहरा हवा आहे. तिसरा पर्याय हवा आहे.

Next Post
एकाच जिल्ह्यात, एकाच दिवसात दोन तहसीलदारांवर कारवाई..! एकीला अटक दुसऱ्या तहसीलदाराचं निलंबन!

अर्धा इंदापूर तालुका त्याच्या ताब्यात, पण पैशाशिवाय त्याचं पानंच हलत नव्हतं.. पैशासाठी कोणत्याही थराला जाणारा सणसर, कळंबचा लाचखोर मंडल अधिकारी फारच उशिरा जाळ्यात सापडला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group