• Contact us
  • About us
Tuesday, June 9, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कडू इंद्रायणची शेती करणारा एकमेव माणूस म्हणजे आमचा मारुतीनाना…!

tdadmin by tdadmin
June 26, 2024
in यशोगाथा, संपादकीय, सामाजिक, सुरक्षा, शिक्षण, शेती शिवार, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, प्रवास, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
अन् त्या मुलानं वडिलांसाठी खड्डा खणला..!

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

अॅड. सचिन वाघ, बारामती.

इरसाल लोकांनी भरलेली दुनिया अनेक पुस्तकात, सिनेमात पहायला मिळते, पण आपल्या सभोवतालीही अशी लोकं आहेत की, ज्यांचा प्रत्येकाचा रंग वेगळा, जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तऱ्हा वेगळीच असते. अगदी आपल्या कल्पनेबाहेरची दुनिया असते या लोकांची! या प्रत्येकाची जगण्याची नशाच वेगळी असते. असाच काहीसा अतरंगी स्वभाव असणारे आमचे लिमटेकचे मारती नाना..! नाना आमच्या दोस्ताचा चुलता आहे बरं का?

अध्यात्माचा वारसा असणारं मारतीनानाचं घर गावातील प्रतिष्ठित तर आहेच, पण आमच्या लहानपणापासून जुना वाडा, केळी नारळाच्या बागा आणि मध्ये मोठ्ठ दत्त मंदिर! दर गुरुवारी आम्ही लहान मुलं आणि गावातील अनेक लोक इथं दत्तआरतीला जमायचो. सगळ्या भारावलेल्या आठवणी आहेत तिथल्या परिसराच्या! 

 इथं चार भावंडांच्या स्वतंत्र कुटूंब व्यवस्था एकाच वाड्याभोवती राहत. सगळा खूप मोठा गोतावळा होता. यात पहिल्यापासूनच कसलीही चिंता मारती नानानी केली नाही. असे निवांत, निष्काळजी लोक अनेक ठिकाणी असतात, पण आमचे नाना जरा हटके आहेत. सगळा संसार त्यांची पत्नी नानीने खांद्यावर घेऊन, सगळ्याची मर्जी सांभाळून केला.

नाना सकाळी अंघोळ करून डोक्यापासून दंड, पोट, सगळीकडे भस्माच्या पट्ट्या कपाळावर तीन चार प्रकारचे गंध लावून, कोपरीवर पांढरा शर्ट, पायजमा, टोपी घालून अगदी देव होऊन घराबाहेर पडतात अन् संध्याकाळी 12 ते 1 वाजता गाणी म्हणत वेगळीच मायावी व्यक्ती होऊनच घराकडे फिरतात. खूप सारे रेकॉर्ड नानाच्या नावावर आहेत. 

मारती नाना एवढा पिक्चरचा चाहता मी अजूनही पाहिला नाही. दुपारी 12 वाजता थिएटरमध्ये गेलेला मारती नाना 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 असे चारही शो बघून रात्री बारा लाच घरी यायचा. दरम्यानच्या काळात 20 ते 25 वडापावचा फडशा पाडलेला असायचा. अनेक वर्षे आमच्या मारती नानानी पहिला नाही, असा एकही पिक्चर बारामती च्या दुर्गा, तारा आणि काहीकाळ श्याम थेटरात न्हवता, शिवाय फलटण, अकलूज कधी कधी पुणेही नानाना लांब नसायचं.

 शेवटी ही थेटरं बंद पडली, पण नानाचा नाद काही जरासुद्धा कमी झाला नाही. अनेक वेगवेगळे व्ययसाय करण्याचा प्रयत्न नानांनी केला, परंतू त्याला यश काही आलं नाही. त्यामुळे चांगला व्यवसाय सापडेपर्यंत व्यवसाय करायचा नाही अशी भीष्म प्रतीज्ञा करून नानांनी आपल पिक्चर बघणं चालूच ठेवलं. बारामती मधील श्याम, दुर्गा, तारा, माळेगावचं मधवानंद, सोमेश्वरचं नवनाथ, अकलूजच श्रीराम, फलटणचं नामवैभव या सगळ्या थेटरांच्या अनेक खुर्च्या नानांनी अनेक वेळा गरम केल्या आहेत.

एकदा असं झालं की..  माळकरी घराणं असल्यानं नेहमी पंढरपूरला नानाच्या घरातील कोणी ना कोणी जात असायचं, परंतु ह्यावेळी सगळी मंडळी रानात व्यस्त असल्याने पंढरपूरची वारी करण्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा नानांना पाचारण करण्यात आलं‌. नानांनी ती जबाबदारी व्यवस्थित खांद्यावर घेऊन सकाळीच पंढरपूर STधरली. पण ST अकलूजला आल्यावर नानाला  पिक्चरचं पोस्टर दिसलं. 

नानाला त्यातच पांडुरंग दिसला. नाना तिथच उतरला. तिन्ही शो बघून बाहेर आला. आत्ता घरी गेल्यावर काय सांगायचं? प्रश्न आला. नानांनी तिथंच दुकानात बुक्का, लाह्या, बतासे घेतले. पुडी फोडून कपाळाला बुक्का लावला. घरी आले. घरच्यांनी मनोभावे नानाचे दर्शन घेतले. नानांनी त्यांना बुक्का लावला अन् लाह्या बताष्याचा प्रसाद खाल्ला. अशा पुढं अनेक वाऱ्या नानांनी हसत हसत केल्या,  

नाना पिक्चर पाहतो हे आख्या गावाला माहीत आहे . त्यामुळे आमच्या गावातील नित्या, नानाच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर बसायचा, अन् नाना त्याला पिक्चरला जोडीदार म्हणून न्यायचे. नित्याला पण भारी वाटायचं. फुकट पिक्चर, फुकट नाष्टा पण नानाच्या लक्षात नित्याच सोकावलेपण आलं. एकदा  असच फलटणला नानाला चिकटून नित्या पिक्चर ला गेला. पिक्चर संपल्यावर नाना नीत्याला घेऊन एका हॉटेल मध्ये गेला.

दोघांनी भरपूर ऑर्डर सांगितली. नित्या ताव मारत होता, तोवर नानांनी हात धुतला. लूनाला किक मारली अन् थेट लिमटेक गाठलं. नित्या जोरदार जेवून हिकडंतिकडं बघतोय, तर कोणाचं नाय. मग काय, हॉटेल मालकानं नित्याला कोंडला. हिकडं गावात नित्या दिसत नाय, म्हणून आई हुडकायला लागली, तेव्हा कळलं की, नित्या फलटणलाच राह्यलाय.

 दोन दिवसांनी गावातल्या लोकांनी जाऊन हॉटेल वाल्याचा हिशोब चुकता करून नित्याला घरी घेऊन आली. हळूहळू काळ बदलला. नेटवर्क मार्केटिंगच वार आलं होतं. कुणीतरी नानांना सांगितलं, एकदा पैसे लावायचे मग आपोआपच पैसे येत राहतात. नानाच उसाच बिल आलं होतं 2 लाख रुपये!

 नानांनी स्वतःचे पैसे भरले आणि खाली नेटवर्क जुळवायला घरातून बाहेर पडले, पहिल्या पाहुण्याकडे गेल्यावर तो म्हणाला सगळं पटतय पण पैसे नाहीत सध्या. नाना म्हणाले, मी भरतो नंतर आल्यावर द्या. मग दुसरा पाहुणा , मित्र शोधत शोधत नानां लिमटेक वरून लुनावर डायरेक्ट परभणीत निघाले, तोपर्यत नानांचे पदरचे 2 लाख संपले होते.

कंपनीचे लोक म्हणाले आपल्याला गोव्याला जायचय …नाना पायजमा, शर्ट, टोपी घालून विमानाने गोव्याला गेले मजा करायला. (येताना ट्रकने यावं लागलं तरी नाना घाबरत नाही) जसं गरज ही शोधाची जननी असते, तसे नाना आपल्या गरजा भागवायला पैशांचा काही तरी शोध लावतातच.

एवढा सगळा संसार चालू असतानाच नानाला गजब शोध लागला. काही लोकाना जादूटोणा उतरवायला कडु इंद्रायन (टरबूजासारखे कडू फळ) नावाचं फळ लागतं असं नानांनी ऐकलं. (कडू वृंदावन, इंद्रफळ, गु. इंद्रक, तुमटीकाई, चित्रफला, महेंद्रवारुणी, बिटर अ‍ॅपल,  कोलोसिंथ ) मग नानांनी कडू इंद्रायन विकायचा धंदा सुरू केला. धंद्याला चांगले दिवस आले. भटके, धनगर, गुराखी यांचं जाळं नानानी निर्माण केलंय आणि त्यांच्याकडून गोळा झालेली ही फळ पुढं विकायला नाना लुनावर लांब लांब प्रवास करतात.

 मग नानाने कडू इंद्रायनची शेतीच केली, महाराष्ट्रत कडू इंद्रायन ची शेती करनारा हा एकमेव माणूस आहे. मुलींची लग्न कशी झाली? मुलांनी घर बांधली, गोठा मोठा केला, नातवंडे आली, शेती सुधारली,परिस्थिती सुधारली, कुटुंबात चढउतार आले, पण नानांना कुणीही डिस्टर्ब करू शकलं नाही. आजही नानांची स्वतःची वेगळी दुनिया आहे. त्यांना कोणी शत्रू नाही, दुश्मन नाही , त्यांना काहीही व्यर्ज नाही. आयुष्याचा आनंद घेणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे हे आमचे मारती नाना रोज सिद्ध करतात.

Next Post
महाराष्ट्र सदनमध्ये जागा शिल्लक नाही; खासदार हॉटेलमध्ये राहिला.. शरद पवारांना भेटण्यासाठी चक्क ऑटो रिक्षाने गेला.. निलेश लंकेचं दिल्लीतही कौतुक..!

महाराष्ट्र सदनमध्ये जागा शिल्लक नाही; खासदार हॉटेलमध्ये राहिला.. शरद पवारांना भेटण्यासाठी चक्क ऑटो रिक्षाने गेला.. निलेश लंकेचं दिल्लीतही कौतुक..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group