नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
महाराष्ट्रातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अनेक अर्थाने गाजली या निवडणुकीला गर्भ श्रीमंत विरुद्ध साधा माणूस अशी देखील प्रचाराची ओळख करून देण्यात आली होती. निलेश लंके साधे आहेत हा साधेपणा ठसवण्याचा प्रयत्न त्यांच्या समर्थकांनी अगदी जाणीवपूर्वक केला, पण तोच साधेपणा दिल्लीतही निलेश लंके घेऊन जाणार असतील तर?
तर बीर काय नाही, महाराष्ट्र सदनामध्ये त्यांना आरक्षित केलेल्या कक्षात महिलांची सोय करण्यात आल्याने निलेश लंकेंनी सरळ हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. आणि शरद पवारांनी बोलवल्यानंतर थेट ऑटो रिक्षाने जाण्याचा. निलेश लंके काल शरद पवार यांना भेटण्यासाठी रिक्षाने गेले आणि त्याची साहजिकच बातमी झाली. शपथ घेताना देखील निलेश लंके यांनी जाणीवपूर्वक इंग्रजीतून घेऊन आपल्या विरोधी उमेदवाराला मात दिली, त्याचीही बातमी अगोदर झालीच होती.
दिल्लीत अजून निलेश लंके साठी वाहनाची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांना सध्या सुप्रिया सुळे त्यांनी त्यांची गाडी उपलब्ध करून दिली आहे मात्र काल महाराष्ट्र साधनांमध्ये शरद पवार येणार आहेत याची माहिती मिळताच ते त्यांच्या हॉटेलमधून बाहेर पडले आणि त्यांनी रिक्षाला हात केला.
थोडा वेळ रिक्षाचालकाला कळले नाही. मात्र खासदाराचे ओळखपत्र असलेला एक व्यक्ती आपल्या गाडीत बसलेला आहे आणि अनेक पत्रकार त्यांचे फोटो घेत आहेत हे लक्षात आल्यावर आपल्या गाडीत मोठी असामी बसली आहे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने तातडीने रिक्षा महाराष्ट्र सदनाकडे वळवली.
आता त्याची बातमी झाली नसेल तरच नवल. अर्थात राजकारणी आपला साधेपणा किंवा आपली प्रतिष्ठित बाजू आणखी सावरण्यासाठी अनेक नाटकं करत असतात, अशीही त्यांच्यावर टीका होऊ शकते, मात्र निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात कोविड सेंटर चालून कोविड सेंटर मध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून निलेश लंके यांच्या साधेपणावर फारशी कोणी टीका करत नाही.











