बारामतीतील क्रीडा शिक्षक आरती एकाड पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत घवघवीत यश मिळवले होते. त्यांनी आताही १व २ जून रोजी झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत ७६ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावले.
वयाच्या ४७ व्या वर्षी नोकरी, घर सांभाळून आरती एकाड पाटील या सातत्याने क्रीडा स्पर्धेत यश मिळवत आहेत. महाराष्ट्र पावर लिफ्टिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत नुकत्याच एक व दोन जून रोजी राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक पटकावले आहे.
मास्टर-१ या गटात त्यांनी हे यश मिळवले. आरती पाटील या बारामतीतील अनेकांत इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शारीरिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर वाघोलीकर, सचिव मिलिंद वाघोलीकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष चंद्रवदन मुंबईकर, प्राचार्या डॉ. ऋचा तिवारी, उपप्राचार्य शितल वायाळ, समन्वयिका स्मिता ढवळीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. पावर लिफ्टिंग च्या सरावासाठी विद्या प्रतिष्ठानचे रजिस्ट्रार श्री कंबोज यांनी आरती यांना मार्गदर्शन केले.











