दौंड ,महान्युज लाईव्ह
दौंड तालुक्यातील पाटस येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिलांचा सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपस्थित राहणार असून त्या महिलांना मार्गदर्शन करणार आहेत.
ही माहिती पाटस ग्रामपंचायतच्या सरपंच तृप्ती भंडलकर आणि उपसरपंच राजवर्धन शितोळे यांनी दिली. जागतिक महिला दिनानिमित्त पाटस ग्रामपंचायत आणि रोटरी क्लब पाटस यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ( दि १२) सकाळी साडे दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय समोर सन्मान महिला कर्तव्याचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बारामती टेक्साटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार या उपस्थित राहुन उपस्थित महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी दौंड च्या माजी आमदार रंजना कुल, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा कांचन कुल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, भाजप दक्षिण जिल्हा अध्यक्षा सविता दगडे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे निमंत्रक पाटस रोटरी क्लबच्या
स्मिता शितोळे यांनी याठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व महिला बचतगट प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. तसेच महिलांना विविध उद्योग उभारणीसाठी मिळणारे अनुदानाबाबतचे मार्गदर्शन, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन, आयुष्यमान भारत कार्ड वाटप असे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच तृप्ती भंडलकर आणि उपसरपंच राजवर्धन शितोळे यांनी केले आहे.











