• Contact us
  • About us
Monday, June 8, 2026
  • Login
Maha News Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह
No Result
View All Result
Maha News Live
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दौंड पोलीसांचा नाद नाय करायचा! लग्नात गर्दीचा फायदा घेऊन नवरीचे दागिने चोरणारी अट्टल आंतरराज्यीय टोळी गजाआड! 

tdadmin by tdadmin
March 1, 2024
in यशोगाथा, सामाजिक, सुरक्षा, आरोग्य, आर्थिक, कथा, कामगार जगत, क्राईम डायरी, राज्य, ताज्या बातम्या, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, व्यक्ती विशेष, Featured
0
दौंड पोलीसांचा नाद नाय करायचा! लग्नात गर्दीचा फायदा घेऊन नवरीचे दागिने चोरणारी अट्टल आंतरराज्यीय टोळी गजाआड! 

दौंड पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची कामगिरी! 

दौंड : महान्यूज लाईव्ह 

लग्न समारंभात घुसून लोकांच्या गर्दीचा गैरफायदा फायदा घेऊन नवरीचे दागिने, खिशातील पैशांची पाकिटे व इतर मौल्यवान साहित्यांवर डल्ला मारणाऱ्या तीन परप्रांतीयांना दौंड पोलिसांनी जेरबंद केले असून त्यात एका महिला गुन्हेगाराचा समावेश आहे. तर यातील दोघे आरोपी पळून गेले अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.  

याबाबत पोलिसांनी दिलेली सविस्तर  माहिती अशी की, दौंड  – काष्टी रोडलगत असलेल्या  पवार पॅलेस येथे मंगळवारी ( दि २७) एक विवाहसोहळाचा कार्यक्रम सुरु असताना निलेश पवार (रा. सोनवडी ता.दौंड ) यांना काही संशयित हे गर्दीचा फायदा घेऊन चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत लक्षात आले. त्यांनी तात्काळ दौंड पोलिसांना माहिती कळविली. 

दौंड पोलिसांनी क्षणांचा विलंब न करता तत्काळ पवार पॅलेस मंगल कार्यालय गाठले आणि कार्यालयातील निलेश पवार आणि नागरिकांच्या मदतीने दोन व्यक्तींना आणि एका महिलेला शिताफीने ताब्यात घेतले.  राज रामनारायण सिसोदिया (वय- २७), बलभीम माकड सिसोदिया (वय- १९), शब्बोबाई प्रतापसिंग सिसोदिया (वय- ५०) सर्व (रा. गुलखेड ता. राजगड मध्यप्रदेश) अशी यांची नावे आहेत.  

पोलिसांनी दोघांची अंगझडती घेतली असता त्यांनी जबरदस्ती चोरी केलेले पाकीट त्यामध्ये ६ हजार ५०० रूपये हे राज रामनारायण सिसोदिया याच्याजवळ मिळून आले. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी आमच्यासोबत राहुल रामनारायण सिसोदिया व दिनेशराजे सिसोदिया (रा.रायगड मध्यप्रदेश) हे देखील असल्याचे सांगितले. 

या आरोपींवर गुन्हा दाखल करून  त्यांना  दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.  दरम्यान, मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात मंगल कार्यालयातील दागिने चोरी करण्यासाठी हे व्यक्ती येतात. या टोळीने पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चोऱ्या केल्या असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान याबाबत मंगल कार्यालयामध्ये संशयास्पद व्यक्ती दिसून आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच संबंधित लग्न समारंभातील लोकांनीही काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले आहे. 

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद गटकुळ पोलीस अमलदार सुभाष राऊत, नितीन बोराडे, विजय पवार, विशाल जावळे, आदेश राऊत, अमोल देवकाते, सुरेश चौधरी, रवी काळे, अशोक जाधव आदींनी केली.

Next Post
हर्षवर्धन पाटलांनी चुणूक दाखवली.. पहिलीच बैठक साखरेचा किमान विक्री दर 40 रुपये करण्याची मागणी! थेट सहकारमंत्री अमित शहांचे निवासस्थान गाठले!

हर्षवर्धन पाटलांनी चुणूक दाखवली.. पहिलीच बैठक साखरेचा किमान विक्री दर 40 रुपये करण्याची मागणी! थेट सहकारमंत्री अमित शहांचे निवासस्थान गाठले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

दौंडच्या ‘नमो उद्यान’ जागेवरून वाद पेटला ! नगरसेविका स्वाती सावंत आक्रमक!

May 29, 2026
मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

मरणोत्तर नेत्रदानाने अजरामर झाल्या कवठे गावच्या नर्मदा लोखंडे! माजी सैनिक किसन लोखंडे यांनी बहिणीची अखेरची इच्छा केली पूर्ण! 

May 29, 2026
पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

पाटस येथे बेकायदा कोळसा भट्टीवर वनविभागाचा पुन्हा छापा; एक लाखांचा मुद्देमाल जप्त!

May 29, 2026
गुप्तधनाचा बहाणा… प्राध्यापकाचा बळी; ४० दिवसांनी उघडली खुनी खेळी!

अवैध मुरूम उत्खननाची तक्रार केल्याने तक्रारदारावर जीवघेणा हल्ला! दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील घटना! तिघांवर गुन्हा!

May 29, 2026
राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

राज्यात अव्वल आलेल्या बारामती बसस्थानकासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे अभिनंदन..!तर  सुनेत्रावहिनींनी केले आगारातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन!

May 29, 2026
बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

बारामती बसस्थानकाला राज्यात प्रथम क्रमांक;बारामतीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा

May 29, 2026
शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

शासनाने अखेर तंटामुक्त गाव मोहिम गुंडाळली?तंटामुक्त गाव मोहिमेतील वृत्तपत्र पुरस्कार समितीचा शासन निर्णय रद्द!

May 29, 2026
बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

बारामती MIDC परिसरात आता CCTV ची करडी नजर.. एमआयडीसी, तांदुळवाडी आणि काटेवाडीत 57 सीसीटीव्ही कॅमेरे!

May 29, 2026
‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

‘विषाचा प्याला’ ठरली गावठी दारू, पुण्यात बळींची संख्या 18 वर; अवैध दारू माफीयांना कोणाचे अभय?

May 29, 2026
बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा मोठा भांडाफोड; तुकाराम मुंढेंची राज्यभर पडताळणी मोहीम! 10 हजार 922 कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू; 316 जणांवर कारवाई!

माफी मागून सक्तीची निवृत्ती घ्या!बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर न्यायालयाचा मोठा दणका; राज्यभर १२० दिवसांत पुनर्पडताळणीचे आदेश

May 29, 2026
Load More

Website Maintained by : Tushar Bhambare

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
    • पुणे
    • मुंबई
    • कोकण
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • महिला विश्व
  • व्यक्ती विशेष
  • शेती शिवार
  • लाईव्ह

Website Maintained by : Tushar Bhambare

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
कॉपी करू नका.
Join WhatsApp Group