बारामती : महान्यूज लाईव्ह
24 व 25 फेब्रुवारी 2024 रोजी पुण्यात झालेल्या जिल्हा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत बारामतीतील शारीरिक शिक्षण विषयाच्या शिक्षिका आरती वैभव एकाड पाटील यांनी रौप्यपदक पटकावले.
मास्टर्स गृपमध्ये 76किलो वजनी गटात त्यांनी ही कामगिरी केली असून त्यांची आता राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गेली 25 वर्ष आरती एकाद्या पावर लिफ्टिंग या खेळात करिअर करत असून त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावले आहेत.
आरती एकाड पाटील या अनेकान्त इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शारीरिक शिक्षका म्हणून कार्यरत आहेत. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनीही केलेली कामगिरी कौतुकास्पद असून त्यांच्या या यशाबद्दल शाळेचे विश्वस्त मंडळ व शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. ऋचा तिवारी यांनी कौतुक केले.











