नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
भारताच्या वाढत्या लोकसंख्येचा भार याविषयी आपण अनेकदा चर्चा करतो, पण हाच भार भारताची ताकद जगात कशी आजमावतो आहे, याचे एक उदाहरण म्हणजे मालदीव मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्यानंतर त्यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्याचा परिणाम म्हणून मालदीवच्या पर्यटनाला भारतीयांनी एकाच दिवसात दणका दिला.
सोशल मीडियावर बायकॉट मालदीव अशा प्रकारचा मेसेज पसरवल्यानंतर काही वेळातच मालदीव मधील दहा हजार हॉटेलचे बुकिंग रद्द करण्यात आलं आणि विमानाची पाच हजार उड्डाणे रद्द झाली. या एकाच दणक्याने मालदीव सरकार ताळ्यावर आलं आणि मालदीव सरकारने सरकारमधील तीन मंत्र्याची हकालपट्टी केली. त्याचबरोबर काही वेळातच मालदीव सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर माफीनामा देखील प्रसिद्ध झाला.
मालदीव सरकारने सरकारमधील मंत्री मरियम शिवूना यांच्यासह तिघांना रविवारी निलंबित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मानहानीकारक केलेल्या वक्तव्य या मंत्र्यांना भोवले आहे. गेली दोन दिवस भारतामध्ये मालदीव मध्ये पर्यटनाला जाऊ नका अशा प्रकारचा सोशल मीडियावर ट्रेंड सुरू होता आणि त्याला दिलेला प्रतिसाद लक्षात घेत मालदीव सरकारने तातडीने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातील माफीनामा प्रसिद्ध केला आणि मंत्र्यांची हकालपट्टी देखील केली.
गेल्या वर्षापासून मालदीव सरकारकडून भारताबाबत सातत्याने विशिष्ट मोहीम राबवली जात होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी मालदीव मध्ये जाऊन आल्यानंतर यामध्ये आणखी काही वक्तव्य येथील मंत्र्यांनी केली आणि त्याचा परिणाम म्हणून भारतीयांनी तातडीने मालदीव मध्ये यापुढे जायचेच नाही अशा स्वरूपाची मोहीम सुरू केली. आणि मालदीवला काही क्षणातच भविष्यातील गंभीर परिस्थिती जाणीव झाली आणि त्यांनी माफीनामा प्रसिद्ध केला.











